Aurangabad

सराईत गुन्हेगारांविरूध्द औरंंगाबाद ग्रामीण पोलीसांची “मोक्का” कायद्याअंतर्गत धडक कारवाई

सराईत गुन्हेगारांविरूध्द औरंंगाबाद ग्रामीण पोलीसांची “मोक्का” कायद्याअंतर्गत धडक कारवाई

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : ग्रामीण पोलीसांनी संघटित गुन्हेगारीवर पोलीसांचा वचक निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 13 आरोपीतांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम( मोक्का) अंतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे गुन्हेगारी वर्तुळाला नक्कीच हादरा बसला आहे.

मोक्का कायद्याअंतर्गत दोषी आरोपीतांची लवकर सुटका होत नाही. यामुळे या आरोपीतांना बराच काळ जेल मध्ये रहावे लागते. ज्यामुळे आरोपी मध्ये मोक्का कायद्याची दहशत निर्माण होते.

पोलीस ठाणे फुलंब्री अंतर्गत साताळा शिवारात असलेल्या राधागोविंद सेवा मिशन या आश्रमावर पडलेल्या दरोड्याचा तपास करतांना एकुण 13 आरोपींताना अटक करण्यात आली होती.

सदर गुन्हा आरोपीतांनी करणसिंग ऊर्फ कन्हैय्या ऊर्फ कन्नु महादु सोळंकी रा. खडी क्रेशर जवळ सांवगी ता.जि.औ.बाद यांने गुन्हेगारांची टोळी संघटित करून घटळास्थळाची रेकी करून गुन्हेगारी कट रचुन आश्रमावर दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले तपासात आरोपी हे पोलीस अभिलेखावरिल सराईत व अट्टल गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button