Aurangabad

औरंगाबाद शहर पूर्णतः अनलॉक, ग्रामीण भागात काही प्रमाणात निर्बंध….

औरंगाबाद शहर पूर्णतः अनलॉक, ग्रामीण भागात काही प्रमाणात निर्बंध….

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : महानगरपालिका क्षेत्रातील निबंध पूर्णतः उठवण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला असून त्याबाबतचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागात तिसऱ्या टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.२४ टक्के आणि भरलेल्या ऑक्सीजन बेड्सची संख्या २२.१९ टक्के असल्यामुळे औरंगाबाद महापालिका क्षेत्र शासनाने निर्धारित केलेल्या पहिल्या गटात समाविष्ट झाले आहे.

त्यामुळे महापालिका क्षेत्रातील निबंध पूर्णतः शिथील करण्यात आले आहेत.
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात ७ जूनच्या सकाळी ७ वाजेपासून नवीन सुधारित आदेश लागू होतील. व्यवसाय व दुकाने अत्यावश्यक सेवा आणि व्यवसायाची दुकाने नियमितपणे सुरू राहतील. मास्क, शारीरिक अंतर आणि सुरक्षा उपकरणांचा वापर अनिवार्य राहील.

इतर सर्व व्यवसाय व दुकानेः अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकानेही नियमितपणे उघडता येतील. अत्यावश्यक सेवेच्या दुकानांप्रमाणेच याही दुकानांना मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर आणि निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे नियमितपणे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button