Bhusawal

भुसावळ शहर व तालुका हद्दीत 17 बेवारस वाहनांचा होणार लिलाव मूळ मालकांनी कागदपत्रे दाखवून वाहने नेण्याचे आवाहन

भुसावळ शहर व तालुका हद्दीत 17 बेवारस वाहनांचा होणार लिलाव मूळ मालकांनी कागदपत्रे दाखवून वाहने नेण्याचे आवाहन

भुसावळ : भुसावळ शहर व भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात बेवारस अशा 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांच्या वाहनांच्या मालकांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे बेवारस वाहनांची ओळख पटवून मूळ मालकांनी आपली वाहने घेऊन जाण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने आहे, तर मुदतीत कागदपत्र सादर न केल्यास त्या वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यांकडून देण्यात आली आहे.
शहर हद्दीत पाच बेवारस दूचाकी
भुसावळ शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिसांकडून गेल्या काही वर्षात पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मूळ मालकांनी 18 एप्रिल 2021 दरम्यान पोलीस ठाण्यात न चुकता हजर राहून वाहन मालकीचा पुरावा सादर करून वाहन न्यावे अन्यथा या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. शहर पोलीस ठाण्यात दुचाकी एम.पी.15 ए.बी.3161, दुचाकी एम.एच.19 ए.एल.9338, दुचाकी जी.जे.एल.डी.9060, दुचाकी एम.एच.19 टी.3389 व विना क्रमांकाची एक दुचाकी जप्त करण्यात आली असल्याचे शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी कळवले आहे.

तालुका पोलिसांकडे 12 वाहने जप्त
भुसावळ तालुका पोलिसांकडे 12 बेवारस दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात डिस्कव्हर एम.एच.20 सी.ई.4065, दूचाकी एम.बी.एल.एच.ए.18 एमएमडीएचई 75560, टीव्हीएस व्हिक्टर एम.एच.28 जे.9860, पल्सर 150 सी.सी., बजाज डिस्कव्हर एम.एच.19 ए.एफ.8249, बजाज डिस्कव्हर एम.एच.19 ए.3584, पॅशन प्लस एम.एच.19.ए.डब्ल्यू.4312, पॅशन प्लस एच.19 ए.सी.5557, टीव्हीएस व्हिक्टर, जुनी बजाज स्कूटर एम.एच.19 एच.6105, जुनी बजाज एमएटी एम.एच.19 एफ.3394, हिरो होंडा दूचाकी अशी 12 बेवारस वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलीस ठाण्याच्या नोटीस बोर्डवर वाहनाचा प्रकार, वाहनक्रमांक, इंजिन नंबर तसेच चेसिस क्रमांकाची यादी लावण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित दूचाकी मालकांनी ओळख पटवून दुचाकी घेऊन जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून मुदतीत कागदपत्र न सादर केल्यास वाहनाचा लिलाव केला जाईल, असेही पोलीस ठाण्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button