Pandharpur

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी अतुल खूपसे पाटील सचिवपदी माऊली हळणवर

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी अतुल खूपसे पाटील सचिवपदी माऊली हळणवर
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : उजनी जलाशयातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाच टीएमसी पाणी इंदापूरला पळवले असुन त्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आणि झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. आज या समितीची पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे बैठक पार पडली असून या समितीच्या अध्यक्षपदी शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील तर सचिवपदी माऊली हळणवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
दरम्यान या झालेल्या निवडी प्रभाकर देशमुख, शिवाजी कांबळे, प्रा.शिवाजी बंडगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या असुन या समितीच्या निवडी पुढीलप्रमाणे झाल्या आहेत. उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे व ॲड. बापूसाहेब मेटकरी, कार्याध्यक्ष सुहास घोडके, सहसचिव किरण भांगे, सरचिटणीस आण्णा जाधव, खजिनदार अभिजित पाटील, तसेच सदस्य विठ्ठल मस्के, दिपक वादेकर, दिपक भोसले, धनाजी गडदे, बळीराम गायकवाड, श्रीकांत नलावडे, संभाजी पवार, संतोष चव्हाण, आप्पासाहेब गवळी, मच्छिंद्र वाघमारे, जयसिंह पाटील, बापू वसेकर, प्रशांत करळे, सुभाष पाटील माऊली जवळेकर यांच्या निवडी करण्यात आल्या.यावेळी प्रवीण नाईकनवरे, आशिष बंडगर, पांडुरंग खरात, नानासाहेब चव्हाण, औदुंबर गायकवाड, नितीन कोळेकर यांच्यासह शेतकरी व चळवळीतील नेते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button