Jalgaon

जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहात महिला कैदीचा आत्महत्येच्या प्रयत्न..!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहात महिला कैदीचा आत्महत्येच्या प्रयत्न..!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका ५० वर्षीय महिलेने जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये पंख्याला गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अनिता राजा चावरे ही महिला अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न केले तसेच तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात अनिता चावरे या न्यायालयीन कोठडीत असताना कारागृहातील बॅरेक क्र. २ मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता चावरे यांनी सोमवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास साडीचा पदरचा काठ कापून बॅरेकमधील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने दुर्घटना टळली. दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न का केला त्याचे कारण कळू शकलेले नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button