Bhadgaw

? संतापजनक…अल्पवयीन मुलीला पैश्याचे अमिश दाखवून केला बलात्कार करण्याचा प्रयत्न अॅट्रोसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल…

अल्पवयीन मुलीला पैश्याचे अमिश दाखवून केला बलात्कार करण्याचा प्रयत्न
अॅट्रोसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल

रजनीकांत पाटील

भडगांव:- तालुक्यातील शिवणी येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला २०० रुपयाचे अमीष दाखवुन बळजबरीने घरात घेऊन जाऊन एका ७१ वर्षीय इसमाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पिडीत मुलीच्या आईने आरोपी हरसिंग हिलाल पाटील वय-७१ रा. शिवणी ता.भडगांव यांच्या विरुद्ध बलात्कार केल्याची फिर्याद दिल्याने भडगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे दि.२५/५ /रोजी दुपारी २ वाजेपुर्वी आरोपी हरसिंग हिलाल पाटील याने अल्पवयीन मुलीस २०० रुपये देतो असे अमीष दाखवुन शिवणी येथील आरोपीच्या रहात्या घरी घेऊन जाऊन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिल्याने आरोपी विरुद्ध भादंवि कलम 376,354,511 प्रमाणे

तसेच पिडीत मुलगी अल्पवयीन व अनु.जमाती ची असल्याने पोस्को व प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास डि.वाय.एस.पी कैलास गावंडे हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button