Amalner

Amalner: भाजयुमो च्या राज्य उपाध्यक्ष पदी मा अनिकेत विजय पाटील यांची निवड…

Amalner: भाजयुमो च्या राज्य उपाध्यक्ष पदी मा अनिकेत विजय पाटील यांची निवड…

भाजयुमोच्या राज्य उपाध्यक्षपदी अनिकेत विजय पाटील यांची नियुक्ती
अमळनेर: प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा राज्याची नूतन कार्यकारिणी दि. ३ रोजी घोषीत करण्यात आली.त्यात अमळनेरचे अनिकेत विजय पाटील यांची
राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या कार्यकारिणीत सरचिटणीसपदी योगेश रविंद्र मैंद, क्रीडा संयोजकपदी विजय बन्सोडे, किरण बोराडे उपाध्यक्ष, भैरवी वाघ पलांडे उपाध्यक्ष, कुशल बापसे, उपाध्यक्ष अंकित संचेती, सचिव अमित घुगे, सचिव विराज मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा
भाजपा महामंत्री विक्रांत पाटील, विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि
भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा
मोर्चा महाराष्ट्रची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

मा अनिकेत पाटील हे माजी केंद्रीय मंत्री मा ना विजय नवल पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Amalner: भाजयुमो च्या राज्य उपाध्यक्ष पदी मा अनिकेत विजय पाटील यांची निवड...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button