Rawer

पत्रकारांवरील हल्ला व खोटे गुन्हे खपवून घेतले जाणार नाही पत्रकार संरक्षण समिती

पत्रकारांवरील हल्ला व खोटे गुन्हे खपवून घेतले जाणार नाही पत्रकार संरक्षण समिती

मुबारक तडवी/रावेर

पत्रकार संरक्षण समिती रावेर तालुका ची बैठक संपन्न
पत्रकार संरक्षण समिती च्या रावेर तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 10 मार्च रोजी रविवारी सावदा येथील विश्रामगृहावर संपन्न झाली.
यावेळी माननीय पत्रकार संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष विनोद जी पत्रे जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने तसेच उपाध्यक्ष राजू तडवी यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष मुबारक तडवी यांनी बैठकीचे आयोजन केले त्यामध्ये पत्रकार संरक्षण समिती मध्ये ज्यांना सभासद व्हायचे असेल ते एकनिष्ठ म्हणून पत्रकार संरक्षण समितीचेच सभासद राहतील भात्र सर्वच पत्रकार बांधवांचे अडीअडचणी समस्या, सोडविण्यासाठी प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहोत पत्रकारांवरील हल्ला व खोटे गुन्हे खपवून घेतले जाणार नाही तत्पूर्वी पत्रकार बांधवांनी संघटनेचे अधिकृत सदस्यत्व अथवा सभासद असणे आवश्यक आहे असे सांगितले यावेळी या सूचना उपस्थित सदस्य नोंदणी करण्यासाठी आलेल्या पत्रकार बांधवांना देण्यात आल्या तसेच पत्रकारांनी आपल्या आपल्या जबाबदाऱ्या ओळखून सामाजिक भान ओळखून आपली पत्रकारिता निकोपपणे आणि समाजहितासाठी करावी अशी चर्चा या वेळी करण्यात आली तसेच आपल्या कोणत्या पत्रकार बांधवांवर जर कुठे अन्याय होत असेल तर त्यास लढा देण्यासाठी पत्रकार संरक्षण समिती रावेर तालुका आपल्या पाठीशी राहील असे ग्वाही यावेळी तालूका अध्यक्ष मुबारक तडवी यांनी सर्व पत्रकार बांधवांना दिली यावेळी सभासद नोंदणी फॉर्म भरण्यात आले तसेच भविष्यात पत्रकारानं विषयीच्या योजना त्यांच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतील आणि पत्रकारांसाठी जे काही शासकीय योजना असतील त्यांचे परिपूर्ण आपल्या समितीच्या पत्रकारांना माहिती देण्यात येईल आणि त्यांना सुयोग्य मार्गदर्शन करून सहकार्य करण्यात येईल असेही यावेळी अध्यक्ष यांच्या तर्फे सुचित करण्यात आले तर येत्या काही दिवसात पत्रकार संरक्षण समिती मार्फत कार्यक्रमाचे नियोजन ही करण्याचे या वेळी ठरविण्यात आले
यावेळी बैठकीला उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष राजू तडवी तालुकाध्यक्ष मुबारक तड़वी पत्रकार/सरपंच मोठा वाघोदा. उपाध्यक्ष राजेश पाटील सचिव तुषार सिंग परदेशी कोचूर कार्याध्यक्ष शेख ईद्रिस . सहसचिव मलक शाकीर मलक साबीर सभासद विनोद कोळी निंबोल आणि अन्य सभासद वर्ग उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button