Atpadi

आटपाडी येथे आयोजित देशविघातक CAA व NRC विरोधी मोर्चाला जनतेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

आटपाडी येथे आयोजित देशविघातक CAA व NRC विरोधी मोर्चाला जनतेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

राहुल खरात

आज दिनांक 14 रोजी आटपाडी येथे CAA व NRC विरोधात आटपाडीचे सुपूत्र व लोकनेते मा.श्री.राजाराम देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला.प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत या मोर्चाची सुरवात आटपाडी बस स्थानकापासून झाली.मोर्चात सहभागी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारने जनतेला विश्वासात न घेता संविधानिक मुल्यांना पायदळी तुडवून देशभर लागू केलेल्या CAA व NRC या कायदया विरोधात घोषणा देत आटपाडी बस स्थानका ते तहसीलदार कार्यालय परीसर दणाणून सोडला.निषेध मोर्चात आटपाडी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व सर्व धर्मीय नागरीकांनी उत्स्फूर्त पणे मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवला.हा विरोध मोर्चा आटपाडी बस स्थानकापासून ते आटपाडी मुख्य बाजारपेठ या मार्गी आटपाडी तहसीलदार कार्यालया पर्यंत पोहोचलया नंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले व त्या ठिकाणी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करतेवेळी आटपाडीचे सुपूत्र जननायक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा. श्री.राजाराम देशमुख यांनी हे केंद्रीय भाजपा सरकार देशातील सर्व पद्ध्तीने गोरगरीब जनतेची दिशाभूल करून जनतेला विश्वासात न घेता संविधानिक मुल्यांना पायदळी तुडवून हुकूशाही पद्धतीने देशकारभार करत आहे.व त्याचाच एक भाग म्हणजे जनमताचा रेटा लक्षात न घेता देशात लागू करण्यात आलेले CAA व NRC हे देशविघातक कायदे.हे दोन्हीं कायदे सर्वधर्म समभाव ही भावना जोपासणारया धर्म निरपेक्ष भारत देशात उभी धार्मिक फुट पाडणारे कायदे आहेत.केंद्रातील भाजपा सरकारने देशभरात या कायदयांना होत असलेला विरोध लक्षात घेऊन वेळीच हे कायदे रद्द करावेत अन्यथा देशात उद्रेक होऊन अराजकता माजेल व हा देश अधोगतीकडे जाईल असे मत मांडले. मनोगत- राजाराम देशमुख, हणमंत राव देशमुख,सुयश कदम , अरुण वाघमारे,डॉ उन्मेष देशमुख,सुरज पठाण,ताजुद्दीन झारी, मुफ्ती मुजम्मील,डी एम पाटील सर,अमोल मोरे,डॉ राजेंद्र कवठेकर,सतीश मोहिते आदींनी आपली मनोगत व्यक्त केले.आटपाडी येथे आयोजित देशविघातक Caa व Nrc विरोधी मोर्चाला जनतेला उत्स्फूर्त प्रतिसाद!उपस्थिती – भारत (तात्या)पाटील, संतोष शिंदे, संभाजी शेठ पाटील,साहेबराव चंदनशिवे,हाजी मंजूर अत्तार,बळीराम रणदिवे,सुरज पठाण,शेखर मिसाळ,जीवन मोरे,अमित वाघमारे,अफजल मुलाणी,सागर ढोले,सुरज पाटील,मुनिर तांबोळी,सलिम तांबोळी,अतुल यादव ,मौलाना समशेर,महंमद पठाण,झाकीर जमादार,अमीर तांबोळी,सरताज तांबोळी,नौशाद जमादार,निहाल मुलाणी,मोहसीन झारी,अमीन मुलाणी,रियाज अत्तार,बशीर मुल्ला,हारुण तांबोळी,आझाद तांबोळी,गौसुद्दीन पठाण,शाहिद जमादार, जावेद जमादार आदी उपस्थित होते.आटपाडी येथे आयोजित देशविघातक Caa व Nrc विरोधी मोर्चाला जनतेला उत्स्फूर्त प्रतिसाद!संभाजी ब्रिगेड आटपाडी ता आध्यक्ष, संतोष शिंदे
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष मुफ्ती मुजम्मील,बहुजन क्रांती मोर्चाचे डॉ राजेंद्र, कवठेकर,दलित महासंघाचे सतीश मोहिते,राष्ट्रवादी चे हणमंतराव देशमुख,काँग्रेस चे राजाराम देशमुख,डी एम पाटील,शिवसेनेचे अमोल मोरे

Leave a Reply

Back to top button