Mumbai

ATS कडून मुंबईत एका दहशतवादी संशयितास अटक..मुंबई कनेक्शन उघड..!

ATS कडून मुंबईत एका दहशतवादी संशयितास अटक..मुंबई कनेक्शन उघड..!

मुंबई दिल्लीत सहा अतिरेकी अटक झल्यानंतर आता महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आणखी एकाला अटक केली आहे.
धारावीत राहणारा जान मोहम्मद शेख याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा साथीदार जाकीर हुसेन शेख याला मुंबईतून अटक केली होती. आता मुंबई एटीएसने धडक कारवाई करत आज आणखी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून रिजवान मोमीन असं त्याच नाव आहे.

अटक करण्यात आलेले जाकीर आणि रिझवान यांचे परदेशी अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे दोघंही जान मोहम्मद शेख साठी काम करत असल्याचा संशय आहे.

सणा सुदीला स्फोट ..

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्ली उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र मधून 6 दहशतवाद्यांना अटक केली होती. सणासुदीच्या काळात गर्दी होणारी गर्दी ,तसेच मोठे पूल आणि रेल्वे ट्रॅक येथे स्फोट घडविण्याचा कट होता.1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या धर्तीवर या वेळी अतिरेक्यांचा स्फोट घडवून आणण्याचा कट होता.

पकडलेले दहशतवाद्यांनी त्यांना पाकिस्तानमध्ये पूल आणि रेल्वे ट्रॅक उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होतं अशी माहिती दिली आहे. या दहशतवाद्यांनी गर्दीच्या रेल्वे मार्गांचा आणि त्यांच्या वेळेचा तपशील गोळा करण्यास सुरुवात केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये दीड किलो आरडीएक्सही सापडला. या RDX ने अनेक मोठे स्फोट घडवले जाऊ शकले असते.तूर्तास तरी हा धोका टळला असून ATS च्या ह्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.पण तरीही नागरिक,आणि प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे. तात्पुरती जरी धोका टळला असला तरी भविष्यात अजून अश्या गुप्त कार्यवाही पाकिस्तान कडून केल्या जाण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button