Nashik

नाशिक जिल्ह्याच्या 2019 -20 यावर्षीचा स्मार्टग्राम पुरस्कार दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीला जाहीर उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण

नाशिक जिल्ह्याच्या 2019 -20 यावर्षीचा स्मार्टग्राम पुरस्कार दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीला जाहीर उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या 2019- 20 या वर्षातील स्मार्ट ग्राम योजनेच्या दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी दिंडोरी तालुक्यातून जानोरी (नाशिक एअरपोर्ट) ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे पुरस्काराचे वितरण उद्या स्वातंत्र्य दिनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना छगन भुजबळ नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम म्हणून दहा लाख रुपये पारितोषिकाचा पुरस्कार दिला जातो त्यातून तालुक्यातील सर्व गावांमधून सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज बघून एका गावाची निवड तज्ञ समिती मार्फत केली जाते याबाबतचे पत्र कालच जिल्हा परिषद चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ग्रामपंचायतीला पाठवले आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल जानोरी ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे जानोरी ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षापासून सार्वजनिक स्वच्छता, आदर्श पाणीपुरवठा योजना गावांतर्गत रस्ते वृक्ष लागवड नागरिकांना विविध शासकीय सवलती मिळवून वेळोवेळी केलेला पाठपुरावा गावातील शालेय सुविधेत केलेली लक्षणीय सुधारणा केलेली आहे वरिष्ठ अधिकारी प्रांत दिंडोरी तहसीलदार गटविकास अधिकारी विस्ताराधिकारी कृषी अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी अंगणवाडी आशा सेविका गावातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने यश मिळाले आहे त्यात प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी पोलीस स्टेशन अधिकारी कृषी अधिकारी आरोग्य कर्मचारी कर्मचारी शिक्षण वआशा वर्कर तसेच गावातील आजी-माजी पदाधिकारी व त्या काळातील माजी उपसरपंच विष्णुपंत काठे सरपंच हिराबाई भोई तसेच जि प सदस्य सारिका ताई नेहरे सभापती दिंडोरी कामिनी चारोस्कर माझी जि प सदस्य प्रवीण जाधव या सर्वांचे सहकार्य लाभले आहे कोट – आमच्या ग्रामपंचायतीने सर्व कामकाज नियोजन बद्ध केले असून त्यासाठी सर्व शासकीय अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला वेळोवेळी सहकार्य केल्याने हा पुरस्कार गावाला मिळाला आहे ही कौतुकास्पद बाब आहे गणेश तिडके – मा उपसरपंच जानोरी ग्रामपंचायत कोट -ग्रामपंचायतीने ग्रामस्थांसाठी अनेक सोयी सुविधा नियोजनबद्धरीत्या तयार केल्या असून ग्रामस्थांनी वेळोवेळी शासकीय कर भरल्याने ग्रामपंचायतीला विकास कामे करण्यासाठी मोठी मदत झाली के के पवार ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत जानोरी

संबंधित लेख

Back to top button