Pandharpur

योग्य वेळी, योग्य उपचार, प्रसन्न व सकारात्मक मन हीच कोरोनाशी लढण्याची गुरुकिल्ली :- विवेक परदेशी नगरसेवक

योग्य वेळी, योग्य उपचार, प्रसन्न व सकारात्मक मन हीच कोरोनाशी लढण्याची गुरुकिल्ली :- विवेक परदेशी नगरसेवक
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : कोरोना या दुसऱ्या लाटे मध्ये आपण पाहत आहोत कि बरेच नागरिक कोरोना झाला हे कळताच घाबरुन जात आहेत, स्वतःची व आपल्या परिवाराच्या काळजीने गंभीर होत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत नागरिकांच्या मानसीकते मध्ये हा फरक आहे. बाहेरुन खुप बलवान वाटतात पण आतुन मनात भिती वाढतच असते. घाबरण्या सारखे काही नसतानाही नागरिक खुप घाबरत आहेत. आपण कोरोनाचे नियम, शासनाच्या सुचना तंतोतंत पालन केल्यास, कोरोणाची चाचणी, डॉक्टरांच्या सुचनेने औषध उपचार घेतल्यास आपण १००% बरे होणार, सुरक्षीत राहणार हे माहीत असतानाही नागरिक प्रमाना पेक्षा जास्त घाबरुन जात आहेत. स्वतःला त्रास करुन घेत आहेत. याचाच परिणाम म्हणजे सोम्य त्रास असुनही, एच आर सिटी स्कोर खुप जास्त नसतानाही नागरिकांना जास्त त्रास होत आहे, गरज नसतानाही जास्त उपचार ध्यावे लागत आहे व काही वेळा जिवावरही बेतत आहे. घाबरून कोरणा वर मात करता येणार नाही हे सिद्धच आहे, हे आपण सर्व जन समजुन घेउन, सर्वांना समजुन सांगितले पाहीजे. काही वेळा आपण स्वतः गोंधळुन जातो. कधीही, कोणताही प्रसंग उद्भवला तर पहिल्यांदा आपण मनाने धिट रहायला पाहीजे, गोंधळुन जायला नको, टेशंन ध्यायला नको, धिर धरला पाहीजे, अती घाई करु नये. नेमके काय करावे याचा आपण, आपले घरातील व्यक्ती, आपल्या मदतीला धावणारे मित्र यामध्ये शांत पणे विचार विनमय करून निर्णय आपण घ्यावा. वेळप्रसंगी फॅमिली डॉक्टर , तज्ञ व्यक्ती यांचा सल्ला आपण घेतला पाहीजे.
प्रत्येक वेळी पैशाची मदत, वस्तुची मदत काम करेलच असे नाही. आपण एखाद्याला धिर दिला, त्यांचे मनोबल वाढवले अशा मदतीचा मोल करता येणार नाही. अशी मदत सदर व्यक्तीला, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अनमोल ठरु शकते. जे व्यक्ती घाबरले आहेत अशा व्यक्तींना धिर देणे हे महत्त्वाचे आहे. वेळीच आपण अशा नागरिकांचा, त्यांच्या परिवाराचा, आपल्या मित्र परिवाराचा आत्मविश्वास वाढल्यास मला खात्री आहे कोरोनाचा रिकवरीचा दर वाढेल. आपण सर्वजन मिळुन अशा प्रकारे मदत करायची आहे. आपले मित्र परिवार, शेजारी किंवा कोणालाही कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना चांगल्या मनाने, न घाबरता त्यांना धिर देउ, आपला चेहऱ्यावरील हावभाव बघुत ते व्यक्ती खचुन जाणार नाही याची काळजी आपण घेउ, सर्व जण बाधीत झाले असल्यास १४ दिवस सुरक्षीत अंतर ठेउन जेवण पोहचवु व आपणास शक्य असेल ती मदत करु. हे काम खुप पुण्याचे असुन असे पेशंट लवकरात लवकर बरे होतील व कळत न कळत आपल्या हातु मदत कार्य घडेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button