Amalner

जन्मदात्या आईला केली लाकडी दांडक्याने मारहाण… मुलाचे धक्कादायक केले कृत्य..गुन्हा दाखल…

निंभोरा येथे मुलाने आईला केली लाकडी दांडक्याने मारहाण…

पैसे का खर्च केले विचारल्याने रागातून केले कृत्य, गुन्हा दाखल…

अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथे मुलाने आईला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात मुलाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संगीता भीमराव पाटील ह्या निंभोरा येथे त्यांचे वडील आधार ताणू पाटील व मुलगा विजय भीमराव पाटील यांच्या सोबत राहत असून शेती काम व घरकाम करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा विजय हा दोन महिन्यापासून काही एक काम करत नसून वेड्यासारखा वागत शिवीगाळ व मारहाण करत असतो. दि. १३ सप्टेंबर रोजी संगीताबाई ह्या त्यांनी ठेवलेले १२ हजार रुपये शोधत असता ते मिळून आले नाहीत. मुलगा विजय याला पैसे तू घेतले का असे विचारले असता त्याने हो मी वैयक्तिक खर्चासाठी पैसे घेतले असे सांगत शिवीगाळ करू लागला. व घरातील लाकडी दांडक्याने दोन्ही हातावर, पाठीवर व डोक्यावर मारहाण केली. डोक्याला मार लागल्याने रक्त निघू लागल्याने फिर्यादी संगीता बाई ह्या बेशुद्ध पडल्या. त्यावेळी फिर्यादीचे वडील व आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सोडवले. त्यावेळी मुलगा विजय हा पळून गेला. जखमी संगीताबाई यांच्या डोक्याला टाके टाकले असून धुळे येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात मुलगा विजय यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ए पी आय जयेश खलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. सुनील अगोणे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button