Nimbhora

निंभोरा येथे प्रतिष्ठित किराणा व्यापाऱ्याला ही कोरोनाची लागण,पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ०५तर २२जणांचे स्वॅब दिले.

निंभोरा येथे प्रतिष्ठित किराणा व्यापाऱ्याला ही कोरोनाची लागण,पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ०५तर २२जणांचे स्वॅब दिले

संदीप कोळी

निंभोरा-
येथस गेल्या आठवड्यात पहिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आज पुन्हा दोन रुग्ण आढळल्याने आठवडाभरात रुग्णांची संख्या ०५वर जाऊन पोहोचली.आज नव्याने आलेल्या रिपोर्ट मध्ये निंभोरा येथील रहिवासी मात्र सध्या जळगावात मुलांकडे राहत असलेल्या प्रतिष्ठित किराणा व्यापाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग पॉझिटिव्ह आढळला.त्या आधी कोळीवाडा परिसरात काल रात्री उशिरा एक तरुण पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्या कुटुंबातील १६सदस्यांना आज फैजपूर येथील कोविद सेंटरला रवाना करण्यात येऊन त्यांचा स्वॅब घेण्यात आला.त्यासोबतच येथील किराणा व्यापारी तथा सहकारातील प्रतिष्ठित व सद्यस्थितीत जळगाव येथे मुलाकडे रहात असलेले ६१ वर्षीय यांच्या कुटुंबातील ०६जणांचे स्वॅब देण्यात येऊन एकूण २२जणांचे स्वॅब देण्यात आले. वाढत्या रुग्णांमुळे ग्रामस्थांची काळजी वाढली असून ग्रामप्रशासन व आरोग्य प्रशासन कामाला लागलेले आहे.दोन्ही ठिकाणी कंटेन्मेंट झोन बनविण्यात आले असून त्यातील स्टेशन परिसर वगळता गावातील दोन्ही भागात ग्रामस्थांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सरपंच डिगंबर चौधरी यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button