Khed

सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्यावर अँट्रोसिटी दाखल करून निलंबित करा – आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे दुर्लक्ष व कामकाजात टाळाटाळ

सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्यावर अँट्रोसिटी दाखल करून निलंबित करा – आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे दुर्लक्ष व कामकाजात टाळाटाळ

खेड / प्रतिनिधी – रोहित सुपे

आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण, शैक्षणिक नुकसान करण्यास जबाबदार असलेल्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी पंढुरे व शिक्षण विभाग आधिकारी नवनाथ भवारी यांच्यावर अँट्रोसिटी गुन्हा दाखल करून, तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी खेड यांच्याकडे बिरसा क्रांती दल खेडच्या वतीने निवेदनाद्वारे केली.

आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव हे कार्यालय आदिवासी मुलांना शिक्षणासाठी नामाकिंत शाळेत प्रवेश देते पण एकदा ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली की पुन्हा वर्षे भर पाहत नाही तसेच त्यांच्या मुख्याध्यापक व वस्तीगृह अधिक्षक यांची बैठक बोलवून अहवाल घेत नाही. स्वत समक्ष भेटी देत नाही कामकाज करताना टाळाटाळ करत असताना व हाच हालगरजी पण आदिवासी बांधवांच्या मुलांना शाळेत भोगावा लागत आहे असे बिरसा क्रांती दल व इतर आदिवासी संघटनेच्या लक्षात आले आहे. जर का आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हे घोडेगाव प्रकल्प अधिकारी हे सर्व खर्च देत आहे तर मग ह्या आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यापर्यंत हे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव मधील शिक्षण विभाग ची जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव सहायक प्रकल्प अधिकारी पंढुरे व शिक्षण विभाग चे नवनाथ भवारी यांच्या वर तात्काळ अँट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना निलंबित करण्यात यावे.

जुन २०१९ पासून सहा महिने हे दोन्ही अधिकार्‍यांनी ११ आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले. मुले सहा महिने घरी बसवली व नवीन शाळेत प्रवेश दिला नाही. शेवटी सहा महिन्यात पालक वारंवार तक्रारी करून सहकार्य केले नाही व दिवाळी नंतर प्रवेश दिला. या सहा महिने मुलांचे शैक्षणिक नुकसान जबाबदार हे दोन अधिकारी आहेत.
त्यानंतर १२ फेब्रुवारी २०२० ला केब्रिंज हायस्कूल भिलार (पाचगणी) येथील मुलांना मारहाण केल्यामुळे ही मुले शाळा सोडून पळून गेली ह्या मुलांना रोज मार खात होती मग ही मुले शेवटच्या टोकाचा निर्णय घेतला आणि शाळा सोडून जायचे असे ठरवले मग शाळेत मारहाण करू नये अशा सक्त सुचना एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांनी या आधी कधीच मुख्याध्यापक व वस्तीगृह आधिक्षक यांना दिला नव्हता.

जर का मुलाना मारहाण केली तर शाळेवर कार्यवाही केली जाईल अशा सूचना दिल्या असता तर केब्रिंज हायस्कूल भिलार पाचगणी मध्ये असा प्रकार घडला नसता त्यामुळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पंढुरे व शिक्षण विभाग अधिकारी नवनाथ भवारी या घटनेला जबाबदार आहेत.

त्यामुळे हे दोन्ही आधिकारी वर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार अँटोसिटी दाखल करावी व तात्काळ निलंबित करावे.
त्याप्रसंगी बिरसा क्रांती दल खेड तालुका अध्यक्ष रोहित सुपे, उपाध्यक्ष संतोष भांगे, सरपंच सुधिर भोमाळे, तालुका प्रसिद्धीप्रमुख राजीव आंबेकर,माजी सरपंच नथू निधन आदी नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button