Khandala

शिरवळ तालुका खंडाळा येथील एशियन पेंट कंपनी समोर कमी केलेल्या कामगारांचे आंदोलन

शिरवळ तालुका खंडाळा येथील एशियन पेंट कंपनी समोर कमी केलेल्या कामगारांचे आंदोलनदिलीप वाघमारेशिरवळ तालुका खंडाळा येथील एशियन पेंट कामगारांना चार वर्षे कंपनीमध्ये काम करीत होते तरी राजकीय सूडबुद्धीने आणि संस्था रजिस्टर असताना कंपनी मालकाने तडकाफडकी काढून टाकल्याने एक फेब्रुवारी रोजी कंपनी गेट समोर आंदोलन कर्त्याने कंपनी मालकाचा निषेध केला कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही कंपनी मालक अद्याप कारवाई झाली नाही.

राजकीय पुढारी दखल घेत नाहीत त्यामुळे कामगारांना वाली कोणीही नाही यामुळे सर्व कामगार न्यायालयात जाणार आहेत बावन्न कामगार आपली व्यथा आंदोलनाद्वारे भांडत होती पोलीस प्रशासन कंपनी मालक बघ्याची भूमिका घेत होते त्यामुळे न्याय मिळणं गुलदस्त्यात आहे सर्वांचे संसार मोडकळीला आले आहे संसाराची राखरांगोळी होत चालली आहे आणि या गोरगरीब कामगारांना शासनाने दखल घेऊन योग्य न्याय मिळावा या अपेक्षेने कामगार टप्प्याटप्प्याने आंदोलन करीत आहेत यावेळी पोलिस बंदोबस्त चोख होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button