India

? महिला दिन विशेष…. निर्भयाच्या आरोपींची आजची टळलेली फाशी…स्त्री,बलात्कार आणि पुरुषी,सामाजिक मानसिकता

? महिला दिन विशेष

स्त्री,बलात्कार आणि पुरुषी,सामाजिक मानसिकता

संपादकीय प्रा जयश्री दाभाडे

आज 2012 मध्ये भर रस्त्यात निर्भयावर सामूहिक बलात्कार करून रस्त्यावर फेकून देणाऱ्या चार आरोपींना फाशी देण्यात येणार होते. परन्तु सलग तिसऱ्यांदा ही फाशी टळली आहे.कायद्याच्या पळवाटा काढत चारही आरोपी सतत या शिक्षे तुन पळवाट काढत आहेत.त्या अनुषंगाने आज महिला दिन विशेष सप्ताह लेख मालिकेत स्त्रिया आणि बलात्कार हा विषय निवडला.

नुकतंच नववर्ष सुरु झालं. बेंगलोर मध्ये भर रस्त्यात महिलांचा विनयभंग
केल्याचा तो किळसवाणा प्रकार घडला आणि
अपेक्षेप्रमाणे मिडीयावर/सोशल मिडीयावर माशांचे मोहोळ उठावे तसे प्रतिक्रियांचे मोहोळ उठले. आता ही काही पहिलीच किंवा अगदीच क्वचित घडणारी घटना नव्हे. खरेतर अशा गंभीर घटना वारंवार घडताना आपण पाहतो/ऐकतो. भारतामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचे प्रमाण पाहिल्यावर एखाद्या महामारी / साथीच्या रोगाची आठवण होते. (आणि कदाचित त्यामुळेच) ह्या विषयाबाबत समाजात एक प्रकारचा कोडगेपणा हल्ली हल्ली येऊ लागला आहे.

? महिला दिन विशेष.... निर्भयाच्या आरोपींची आजची टळलेली फाशी...स्त्री,बलात्कार आणि पुरुषी,सामाजिक मानसिकता

NCRB च्या आकडेवारी नुसार देशात दिल्ली उत्तर प्रदेशबरोबरच बलात्कार घटनांमध्ये मध्य प्रदेश एक नं ला असून पुरोगामी महाराष्ट्र दोन नं ला आहे.सर्वात जास्त शिकलेले सुशिक्षित राज्य केरळ देखील यात मागे नाही ही शोकांतिका आहे.प्रत्येक चार तासात एक बलात्कार होतो आणी प्रत्येक 2 तासात बलात्कार चा असफल प्रयत्न केला जातो.

? महिला दिन विशेष.... निर्भयाच्या आरोपींची आजची टळलेली फाशी...स्त्री,बलात्कार आणि पुरुषी,सामाजिक मानसिकता

?️ बलात्कार

व्यक्तिच्या संमतीशिवाय किंवा बळजबरीने लैंगिग संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बलात्कार होय. यात पीडित व्यक्ती बहुतांशी स्त्री असते. हा एक लैंगिक अत्याचार व कायदेशीर गुन्हा आहे. जर बलात्कार एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केला तर मग त्याला ‘सामूहिक बलात्कार’ म्हणतात. बलात्कार हीन अपराधांच्या श्रेणीत येतो ज्याची शिक्षा आयुष्याभर किंवा मृत्यूपर्यंत होण्याची शक्यता आहे.बलात्काराचे न्यायालयीन अहवाल, सुनावणी आणि दंड ठोकरणे दर वेगळे आहे.

बलात्कार हा हजारो वर्षांपासून स्त्रियांवर होत आलेले आहेत.1972 मध्ये शानबाग केस,शाह बानो केस,निर्भया केस,प्रियंका रेड्डी केस इ वेगवेगळ्या काळात भारतात गाजलेल्या केसेस आहेत.

भारतीय दंड संहितेमध्ये कलम ३७५ मधे बलात्काराची व्याख्या केली आहे.सदर कलमात गुन्ह्यांची आणि शिक्षेची चर्चा करण्यात आली आहे.

जेव्हा जेव्हा पुरुष स्त्रीच्या संमतीशिवाय तिच्याशी जबरी संभोग करतो,त्या त्या वेळेला तो बलात्कार समजला जाऊ शकतो.

?️ कलम ३७५ आणि त्याची उपकलमे पुढीलप्रमाणे:

  • कलम ३७६(अ) – पोलीस ओफ्फिसिरकडून करण्यात आलेला बलात्कार

  • कलम ३७६(ब)- कामाच्या ठिकाणी वरिष्ठ असण्याचा गैरफायदा घेऊन केलेला बलात्कार

  • कलम ३७६(क) – जेलमध्ये ,रिमांड होम मधे कार्माचारांकडून केलेला बलात्कार

  • कलम ३७६(ड)- हॉस्पिटल मधे व्यास्तापन अथवा होणारा बलात्कार

  • कलम ३७६(इ) – महिला गरोदर अश्ल्याचे माहित केलेला बलात्कार

  • कलम ३७६(फ)- १२ वर्षाखालील मुलीवर केलेला बलात्कार

  • कलम ३७६(ग)- गंग रेप (एका पेक्षा अनेक पुरुष्यानी केलेला बलात्कार)

  • बालात्कार्याच्या गुन्ह्या साठी १० वर्षे सक्तमजुरी अथवा जन्ठेपेची शिक्षा होऊ शकतो आणि दंडाचीही तरतूद आहे .

  • कलम २२८ (ए ) नुसार बलात्कारित स्त्रीच्र नाव गोपनीय ठेवणे बंधनकारक असून तिचे नाव जाहीर केल्यास २ वर्षे तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.

  • सी.आर.पी.सी. कलम १६४(ए) – महिलेच्या वैद्यकीय तपासणीला परवानगी आहे.

  • सी.आर.पी.सी. कलम ३२७ (२)– नुसार गोपनीय पद्धत तिने इन कॅमेरा पिडीत महिलेचा जबाब नोंदविण्यात यावा.वाना मध्ये ९२.९ आणि लिथुआनियामध्ये ६.३ मध्ये मध्यस्थ म्हणून आहेत. अजनबी द्वारे द्वेषभावनेने सामान्यतः पीडित लोकांकडून बलात्कार कमी आहे.

    ? महिला दिन विशेष.... निर्भयाच्या आरोपींची आजची टळलेली फाशी...स्त्री,बलात्कार आणि पुरुषी,सामाजिक मानसिकता

?️ बलात्कार का होतात?

सध्याची परिस्थिती बघता, शीर्षक लिहिताना ‘स्त्रियांवर बलात्कार का होतात?’ असं मनात आलेलं. पण दक्षिण आफ्रिकेतील एका तरुणा वर झालेला बलात्कार आठवला, त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे पण इथे दुर्लक्ष करु शकत नाही. बलात्कार म्हणजे काय तर पुरुषाने स्त्रीवर किंवा स्त्रीने पुरूषावर केलेले लैंगिक आक्रमण. बलात्काराच्या समोर येणाऱ्या घटनांमध्ये ९९.९९ टक्के स्त्रीया बळी पडलेल्या दिसतात. सध्या बलात्काराच्या, विनयभंगाच्या एवढ्या घटना समोर येतायत कि कोणीही स्त्री रात्रीच नव्हे तर दिवसा सुद्धा एकटी बाहेर पडायला घाबरते. दरम्यान सर्वसाधारण गप्पा होत असताना देशात स्त्रीयांना आजही कशी दुय्यम वागणूक दिली जाते हा विषय निघाला. त्यात ‘शिकलेलेले’ सुद्धा होता. तो या सगळ्याचं समर्थन करताना दिसून येतात. स्त्रीयांनी डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे, जास्त शिकल्यावर मुली बिघडतात इ . लोकांच्या मनात काही गोष्टी एवढ्या खोलवर बसल्याआहेत कि हे पटतच नाही. त्यापुढे जाऊन जेव्हा स्त्रीयांवर होणाऱ्या बलात्काराचं समर्थन करतात तेव्हा त्याची कारणं ऐकून आपण हदरतो . मग जाणीव झाली कि हे सगळे सावजाची वाट बघणारे शिकारी आहेत. अनुकूल परिस्थिती मिळाली तर हे नक्कीच बलात्कार करायला मागे पुढे बघणार नाहीत.

बलात्कार थांबवता येतील का? याचं उत्तर सुद्धा शोधण आवश्यक आहे. मी स्त्रियांचा अभ्यास करत असताना जस जसे या विषयावर वाचन झालं , काही documentries पाहिल्या तेव्हा असंख्य कारणं समोर आली.

सूड घेण्यासाठी, वर्चस्व दाखवण्यासाठी, बदनाम करण्यासाठी वगैरे. पण या सगळ्यात एक समान व मुख्य गोष्ट होती. लैंगिक आकर्षण. जशीजशी उत्तरं शोधायचा प्रयत्न केला. लैंगिक आकर्षणाचा ‘अतिरेक’ हेच मुख्य कारण दिसून आलं. आकर्षण नैसर्गिक आहे. आकर्षण एकतर्फी असू शकतं. पण सेक्स एकतर्फी असू शकत नाही. तो केला गेला तर तो बलात्कार ठरतो. आणि हे मूळ आहे. खरंतर यावर मानसशास्त्रामध्ये खूप संशोधन झालं असेल असं वाटल होतं पण दुर्दैवाने जास्त काही सापडलं नाही. मग पुन्हा यावर उत्तरं शोधायचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आलं कि बलात्काराच्या घटना थांबवणं खूपच अवघड आहे. लैंगिक आकर्षण जरी नैसर्गिक असलं तरी ते दुसऱ्या व्यक्तीवर लादून आपली शारीरिक गरज भागवणं हे ‘वाईट’ प्रकारात मोडतं हे कोणत्याही विवेक बुद्धी जागृत असणाऱ्या माणसाला समजेल. पण काय चांगलं आणि काय वाईट हे तुम्ही कसं ठरवता? सामन्यतः आपण असं म्हणू शकतो कि दुसऱ्या व्यक्तीला आपल्या कृतीमुळे इजा किंवा त्रास होणार असेल तर ती वाईट. पण असा विचार सगळेच करत नाहीत. प्रत्येकाची जडणघडण व त्यावर आजूबाजूचा सामजिक प्रभाव असतो, त्याच बरोबर त्याच वैयक्तिक मत असतं. योग्य आणि अयोग्य ची जाणीव असते किंवा नसते.

माणूस बलात्कारी एका दिवसात बनत नाही. आणि तशा वातावरणात, समाजात राहून तो तसा बनेलच असंही नाही किंवा उच्च शिक्षित आहे, कौटुंबिक ‘संस्कार’ चांगले आहेत म्हणून तो तसं करणार नाही अस सुद्धा ठामपणे म्हणू शकत नाही. एक ठामपणे सांगू शकतो जो चोरी करु शकतो, खून करु शकतो, तो बलात्कार सुद्धा करु शकतो.
मानसशास्त्राच्या दृष्टीने यावर प्रचंड संशोधन करण्याची गरज आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात शारीरिक शिक्षणा बरोबर मानसिक समतोल हा विषय संशोधन करुन द्यायला हवाय. काही बदल करायचा असेल तर तो याच level ला करावा लागेल असं माझं मत आहे.

?️ आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, बलात्कार का होतो?

ह्या प्रश्नाची जी उत्तरं, अगदी सर्वसामान्य माणूस ते विचारवंत (बरेचसे, सगळे नाही आणि ह्यात स्त्रियाही येतात) देतात त्यांच्या मध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे खाली दिलेले विचार आढळतात.

• बलात्कार करणारे पुरुष अडाणी, अशिक्षित,
विकृत, खेडवळ, असंस्कृत, बुरसटलेल्या
विचारांचे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात.

• बलात्काराच्या शिकार झालेल्या स्त्रिया ह्या
गरीब ते मध्यम वर्गीय गटातल्या, नोकरी-
कामधंदा करणाऱ्या, तोकडे किंवा
पाश्चात्य(modern?) पद्धतीचे कपडे
घालणाऱ्या, रात्री उशिरा घराबाहेर राहणाऱ्या (
नोकरी, काम शिक्षण किंवा अगदी मौज
मजेसाठीही), fashion(!) करणाऱ्याअसतात.

• पुरुषांना बऱ्याचदा त्यांच्या कामोत्तेजना शमवता न आल्यामुळे बलात्कार होतात (कामाकरताबाहेर राहिल्याने कुटुंब आणि बायकोशी संपर्क न राहिल्यामुळे?)

• सध्याच्या काळात सगळीकडे सिनेमा,मालिका,
जाहिरातीमध्ये स्त्रियांना उत्तेजक/ उत्तान
अश्लील हावभाव/ वर्तन करताना दाखवतात
किंवा पोर्नफिल्म्सचा सूळसुळाट झाल्यामुळे!

ही यादी अजून कितीही लांबवता येईल पण ढोबळ मानाने अशा प्रतिक्रियाच येतात.

ह्या प्रतिक्रिया ३ विभागात वर्गीकृत करता येतात.

• भूमिका भंग
• मर्यादा भंग

• औचित्यभंग किंवा धार्मिक/सांस्कृतिक सीमांचे
उल्लंघन

पुरुषांनी स्त्रियांचे रक्षण करायचे असते आणि तसे करायच्या ऐवजी तेच त्यांचे शोषण करू लागतात किंवा पुरुष स्त्रियांचे/त्यांच्या अधिकारांचे, लज्जेचे, अब्रूचे रक्षण करण्यात कमी पडतात. म्हणजे उदा.
पोलीस हे कायद्याचे रक्षक पण जेव्हा तेच कायद्याचे उल्लंघन करतात तेव्हा ते रक्षक न राहता भक्षक बनतात किंवा ते कमी पडतात तेव्हा कायदा आणि भूमिका समाजाचा (फक्त भारतीय नाही) स्त्री विषयक दृष्टीकोन
हा सगळ्यात गोंधळाचा आणि वाट चुकलेला दृष्टीकोन आहे. सर्वसामान्य माणूस मग तो स्त्री असो व पुरुष,गरीब असो व श्रीमंत, अशिक्षित असो व अगदी सुशिक्षीत विचारवंत, त्यांच्या मनात स्त्रीचे सामाजिक स्थान काय आहे ह्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर एकंदरीत ह्या प्रश्नाच्या उत्तराची फलश्रुती अवलंबून आहे. माणूस सामाजिक प्राणी आहे असे आपण
अगदी लहानपणापासून शिकतो आणि तसे त्यात
चुकीचे काही नाही. समाज म्हटले की त्यातल्या प्रत्येक घटकाचे समाजातले स्थान, कर्तव्य, जबाबदारी आणि तदनुषंगिक मिळणारे लाभही आले.मग ह्यात स्त्रीचे स्थान नक्की कुठे आहे? जगातल्या जवळपास सर्व संस्कृतींमध्ये स्त्रीचे स्थान हे माणूस म्हणून नाही तर एक वस्तू किंवा सेवा पुरवणारीव्यवस्था म्हणूनच आहे. हे इतक्या नागडेपणाने कुणी मांडत नसले तरीही सर्व धर्म आणि संस्कृतींचा स्त्री विषयक दृष्टीकोणाचा गाभा तोच आहे. स्त्री ही माणूस
नसून एक वस्तू किंवा सेवा पुरवणारी पद्धती आहे
म्हणजेच ती कुठल्यातरी पुरुषाची खाजगी मालमत्ता आहे असे मानले गेल्यामुळे स्त्री विषयी जाहीरपणे बोलताना, उल्लेख करताना आणि प्रत्यक्ष वागताना

संदर्भ

  • सुझान ब्राऊन मिल्लर

“Against our will- Men Women

and Rape”

  • You tube BBC 24 “Documentary on Women’s liberation movement.”
  • स्त्री विरुद्ध पुरुष मूळ ले. शिवराज गोर्ले अनुवाद जयश्री रावळेकर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button