Motha Waghoda

भाजपाची सां.बा त धडक सावदा- रावेर रस्त्यावरील खड्डे गडप राहुल पाटील यांनी आंदोलनाचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे डांबर खडी टाकून सावदा मोठा वाघोदा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू ग्रामस्थ वाहन धारकांना समाधान

भाजपाची सां.बा त धडक सावदा- रावेर रस्त्यावरील खड्डे गडप राहुल पाटील यांनी आंदोलनाचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे डांबर खडी टाकून सावदा मोठा वाघोदा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू ग्रामस्थ वाहन धारकांना समाधान

मोठा वाघोदा : मोठा वाघोदा.ता.रावेर बुऱ्हाणपूर अंकलेश्र्वर हायवे वरील सावदा ते रावेर दरम्यान पडलेल्या मोठ मोठ्या खड्यांसंबंधी सावदा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता आय.बी. शेख साहेब यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी चागलेच धारेवर धरले होते अनेक दिवसांपासून सावदा रावेर दरम्यान रस्त्यावर खूप मोठ मोठे खड्डे पडलेले होते या खड्यांमुळे आज पर्यंत अनेक छोटे मोठे अपघात घडत असत यातील अनेक अपघातांमधे अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे व त्यांचा संसार उद्धवस्त झालेला आहे नुकतेच काही दिवसापूर्वी मस्कावद सिम येथील महिलेचा आपल्या आईच्या अंत्यदर्शनासाठी जात असताना याच खड्डयांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला वारंवार तक्रार करून ही सार्वजनिक बांधकाम विभाग नाकर्तेपणामुळे नाहक लोकांचे जीव जात असून याचा जाब विचारण्यासाठी आज राहुल भाऊ पाटील यांच्या नेतृत्वात सावदा येथे जाऊन शेख साहेबांना जाब विचारण्यात आला व जळगाव येथील मुख्य कार्यकारी अभियंता सौ. गिरासे मॅडम यांचेशी राहुल पाटील यांनी दुरध्वनी वरुन यासंबधी तक्रार केली होती लवकरात लवकर खड्डे बुजण्यात यावे व रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केलेली होती व सावदा रावेर रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास सां बा सावदा विभागीय कार्यालयात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता मुख्यकार्यकारी अभियंता गीरासे मॅडम यांनी येत्या दोन दिवसात खड्डे बुजण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले होते यावेळी भाजपा पदाधिकारी राहुल पाटील,भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय माळी, वाघोदा सरपंच मुबारक (राजू) अलिखा तडवी,उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी,गोकुळ महाजन,विशाल पाटील,बाळु काकडे,मुरलीधर महाजन,स्वप्नील पवार व कार्यकर्ते उपस्थित होते. सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सावदा ते मोठा वाघोदा वडगाव सुकी नदी पर्यंतचे रस्त्यावरील खड्डे डांबर खडी टाकून बुजविण्याचे काम सुरू केले असून उर्वरित प्रगतीपथावर आहेत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यामुळे वाहन धारक तसेच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button