Maharashtra

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड…

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड...

अमळनेर : जुने बसस्टँड भागात ऍक्टिव्ह स्पोर्ट्स क्लब च्या नावाने झन्ना मन्ना जुगार खेळताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी 20 जणांना अटक करून त्यांच्याकडून 95 हजार 750 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बापू रोहम ,ए पी आय स्वप्नील नाईक ,अनिल देशमुख , विनोद पाटील , जितेंद्र पाटील ,सुधाकर अंभोरे , विलास पाटील , रामकृष्ण पाटील, मुरलीधर बारी यांनी जुने बसस्टँड भागात छापा टाकून ऍक्टिव्ह स्पोर्ट्स क्लब मध्ये काही लोक पैसे लावून झन्ना मन्ना जुगार खेळताना आढळून आले.

त्यात बबलू शेख सुपडू वय 28 रा जोशींपुरा , नाना भास्कर पाटील वय 41 झामी चौक , सुधाकर चिंधु माळी वय 40 रा वरवाडे ता शिरपूर , सागर प्रकाश इंगळे वय 25 रा मिळचाळ , कैलास सुकलाल धनगर 45 वरवाडे ता शिरपूर ,प्रल्हाद दामोदर भावसार 40 किसमत नगर शिरपूर , शांताराम धापु कोळी 61 रा वाघाडी शिरपूर , युनूस संमद पटेल 40 रा वाडी शिरपूर , संजय रूपंचांद चौधरी 50 रा तांबेपुरा ,अमळनेर ,नंदू गणेश चव्हाण 47 रा मिळचाल , भीमराव हिरामण पाटील 62 रा पैलाड ,विलास शामराव महाजन 57 रा बालाजीपुरा ,रहीम शाह सत्तार शाह 38 रा वाडी ता शिरपूर ,शांताराम नानु साळुंखे57 सुंदरगडी चोपडा , अनिल दिगंबर पाटील अमळनेर , नारायण दिगंबर मराठे रा धुळे ,प्रकाश सुदाम पाटील वाडी शिरपूर , किरण रामसिंग बहारे रा तांबेपुरा , नवल बोरसे रा पैलाड याना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून एकूण 95 हजार 750 रुपये जप्त करून त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र्र जुगार प्रतिबंधक कायदा 4 व 5 तर भादवी 278 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button