Paranda

भटक्या समाजातील कलाकार दुर्लक्षीत, गावो – गावी जावून जगत आहेती जीवन

भटक्या समाजातील कलाकार दुर्लक्षीत, गावो – गावी जावून जगत आहेती जीवन

सुरेश बागडे परंडा

परंडा : परंडा येथे दि ३ मार्च रोजी नागपूर येथील एका गायक कलाकार त्याच्या पत्नी, मुली सह रस्त्याच्या कडेला भर उन्हात बसुन गितांचा कार्यक्रम केला या रस्त्यावरच्या कलाकाराची कला पाहण्या साठी नागरीकांचे पाऊले कलाकराच्या दिशेने वळली व भरभरून प्रतिसाद दिला .रस्त्याच्या कलाकारांनी नागरीकांच्या मनावर भुरळ पाडली असुन माझ्या शिवरायाची तलवार , मै भीमराव की बेटी हू या गीता सह देश भक्तीवर सुंदर असे हिंदी ,मराठी गाणे सादर केले

भारतातील अश्या कलाकारांना शासनाची कोणतीही मदत मिळत नसल्याने रस्त्यावरचे कलाकार तसेच डोंबारी चा खेळ दाखवीनारे हजारो कुटूंब गावो गावी फिरून जिवन जगत आहे .

भारत देश महासत्ता कडे वाटचाल करीत असल्याचा दावा नेते करीत असले तरी देशातील लाखो कुंटूबाला रहायला घर नाही कसायला जमीन नाही हाताला रोजगार नाही पोटाची खळगी भरण्या साठी गावो गावी फीरून जिवन जगत आहेत .

देश इग्रजांच्या गुलामीतुन मुक्त झाला देशाला स्वतंत्र मिळाले मात्र या स्वातंत्र्याचा फायदा तळागाळा पर्यंत पोहचलाय का हा प्रश्न कुठेच चर्चेत येत नाही

विविध परंपरा संस्कृती असलेल्या भारताच्या मातीत लाखो कलाकारांनी गरीबीच्या झोपडीत जन्म घेतला या कलाकारा मुळे भारताच्या वैभवात भर पडली मात्र अनेक गुणवंत कलाकारांना योग्य संधी मिळत नसल्याने त्यांना आपली कला रस्त्यावर सादर करावी लागत आहे

पिढीजात व्यावसाय करणारे कलाकार आजही हलाखी चे जिवन जगत आहेत नेहमी भटकती करावी लागत असल्याने त्यांची मुले शिक्षणा पासुन वंचीत राहत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button