sawada

त्या ट्रक चालकाचा अपहरण करणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक : सावदा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी – मात्र सदर प्रकरणी घातपाताची शक्यता.

त्या ट्रक चालकाचा अपहरण करणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक : सावदा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी – मात्र सदर प्रकरणी घातपाताची शक्यता.

“याकूब पटेल अपहरण प्रकरणी सतत ४ महिन्यांपासून सुरू ठेवलेल्या तपासात अखेर सावदा पोलिसांनी आरोपीला पकडून सिद्ध केले. (सावधान – कानून के हात बहुत लंबे होते है)”

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातून एका ३५ वर्षीय तरुणाचे ट्रक सह अपहरण करून घातपात केल्याच्या संशयावरून सावदा पोलिसांनी एकाला अटक केली असून सदरील ट्रक परस्पर विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील लहान वाघोदा खुर्द येथील रहिवासी याकूब गयासुद्दीन पटेल वय ३५ हा त्याची मालवाहू ट्रक (एम एच १९ सी वाय ६८४३) घेऊन जात असताना १५ मे २०२१ रोजी सकाळी १० वाजता ऋषिकेश उर्फ माधव विठ्ठल राव शेजवळ वय २४ रा. दावरवाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद, राजू ठेगडे (पूर्ण नाव माहीत नाही) रा. पवन नगर नाशिक आणि संजय (पूर्ण नाव माहीत नाही) रा. औरंगाबाद यांनी संगनमताने याकूब पटेल यांचे अपहरण करून त्यांच्या ताब्यातील ट्रकची नागपूर येथे विक्री करून विल्हेवाट लावली होती. सुरुवातीला सावदा फैजपूर येथे याकूब पटेल यांची बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली होती. त्यानंतर अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर सावदा पोलिसांनी थेट तपासाची चक्रे फिरवली असता संशयित आरोपी ऋषिकेश उर्फ माधव विठ्ठलराव शेजवळ याला सावदा पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान अपहरण झालेले याकूब पटेल यांना ठार मारल्याच्या संशय बद्दल चौकशी सुरू केली असून याप्रकरणी तीन जणांवर सावदा पोलिस ठाण्यात गु.र.नं.१५५/२०२१ भादवी कलम ३६५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरील संशयित आरोपीला ५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कस्टडी मिळाली आहे. तसेच पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष एपीआय देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संजय चौधरी, सुरेश आठवले, मोहसीन खान पठाण, विशाल खैरनार, हे करीत आहे.

तसेच ट्रक चालक व मालक याकुब पटेलाचे नाशिक येथील एका महिलेशी ओळख संबंध असल्याचे बोलले जात असून या बाबतची माहिती ट्रकचे कंडक्टरला असावी असे तर्क वितर्क लढवले जात असून नवीन ट्रक असल्याने लालसा पोटी त्या महिला सह संशयित आरोपी यांनी सामूहिक रित्या किंवा कसे सदरील घटना केली असावी अशी चर्चा आहे.? यासंदर्भात पोलिसांनी संशयितां सह याकूब पटेल यांचे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स बाबत तपास केल्यास निश्चितच गुळ रहस्य उघडकीस येतील. व आरोपींमध्ये वाढ होईल हे मात्र खरे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button