Bollywood

बिग बॉस मध्ये सलमान ऐवजी असेल हा अभिनेता

? Breaking… बिग बॉस मध्ये सलमान ऐवजी असेल हा अभिनेता..!

मुंबई टेलिव्हिजन इंडस्ट्रीत बिग बॉसला सगळ्यात मोठा रियालिटी शो आहे. या शोचा टीआरपी सुरुवातीपासूनच चांगला असतो.बॉलीवूडचा भाई म्हणजेच सलमान खान हा शो होस्ट करतो आणि म्हणून या शोला सगळ्यात मोठा रियालिटी शो समजलं जात. सलमान खान चौथ्या सिझनला शो मध्ये आला. त्याने १० वर्ष पूर्ण केले आहेत.
मध्यंतरी 2 शो मध्ये सलमान नव्हता आणि ते ते दोन सिझन फ्लॉप झाले होते.त्यामुळे सलमान खान आणि बिग बॉस शिवाय अधुरे आहे.ह्या शोचा प्रत्येक सिझन वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त असतो.

या शोचा १५ वा सिझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.आणि शोमध्ये कोण-कोण असेल याची यादी प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे. अंकिता लोखंडे,रिया चक्रवर्ती, अर्जुन बिजलानी असे काही नावं सध्या या शोमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही चर्चा रंगत असताना अजून एक मुद्दा समोर आला आहे की सलमान खानने या शोचं होस्टिंग करण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे चर्चांना उत आला आहे. शो फ्लॉप होणार का?नवीन होस्ट कोण असणार? सलमान का नाही म्हणाला इ चर्चा रंगत आहेत. सलमान खान जेव्हापासून हा शो होस्ट करत आहे तेव्हापासून शोची लोकप्रियता वाढलेली आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या होस्टिंग प्रेक्षकांच्या मनात सलमाननं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

सलमान ऐवजी मेकर्सने एका वेगळ्या अभिनेत्याची निवड केली आहे. आता या सीझनसाठी मेकर्स कडून माहिती आली आहे की, बिग बॉस टीव्हीच्या आधी OTT वर ब्रॉडकास्ट करण्यात येणार आहे. सध्या OTT च नवीन ट्रेंड असल्यामुळं मेकर्सने असा निर्णय घेतला.
पण शोच्या चाहत्यांना खरा धक्का तर मेकर्सनं आत्ता दिला आहे. निर्मात्यांनी सलमान ऐवजी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची बिग-बॉसचा होस्ट म्हणून निवड केली आहे. सिद्धार्थ हा बिग बॉस १३ चा विजेता होता. सध्या सिद्धार्थ शुक्ला लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याच्या एका वेब-सीरिजला आणि म्युझिक व्हिडीओला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.मेकर्सने त्याच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन होस्ट म्हणून त्यांची निवड केली आली आहे. सलमान खान किंवा सिद्धार्थ शुक्ला यांनी याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सलमानच आरोग्य प्रत्येक सिझन मध्ये वाढणारी फी हे लक्षात घेई कदाचित आता मेकर्सने सलमानला या शोचा होस्ट म्हणून रिप्लेस केलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button