Maharashtra

खर्चाचा दुरुपयोग न करता पूरग्रस्तांना ब्लँकेट वाटप त्याचबरोबर विविध कार्यक्रम राबवून अर्जुन चव्हाण यांचा वाढदिवस केला साजरा

खर्चाचा दुरुपयोग न करता पूरग्रस्तांना ब्लँकेट वाटप त्याचबरोबर विविध कार्यक्रम राबवून अर्जुन चव्हाण यांचा वाढदिवस केला साजरा


रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर रत्नागिरी, चीपळून
,रायगड,सांगली आदी भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांना स्थलांतर करावे लागले. पूर परिस्थितीमुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली अनेकांच्या घरांमध्ये शेतामध्ये पाणी आल्याने मोठे नुकसान झाले अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून 150 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तसेच कोविडच्या रूग्णांना मदत व्हावी या उद्देशाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आदि सामाजिक हिताचे विविध कार्यक्रम मराठा महासंघाच्या वतीने तसेच अर्जुनराव चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आले. तांबट धर्मशाळा येथे दिनांक एक ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष अर्जुन राव चव्हाण यांनी केले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात आलेले ब्लॅंकेट आज पंढरपूरचे उपविभागीय प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे इंदापूर बावडा येथील प्रगतशील बागायतदार व उद्योजक काशिनाथ अनपट तसेच सोलापूरचे पोलीस सहाय्यक विनायक काळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, काशिनाथ अनपट, विनायक काळे, मराठा महासंघाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमोल पवार, शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव तालुका कार्याध्यक्ष शिवाजी मोरे, शहर संघटक काका यादव, सचिन थिटे,रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नागेश गायकवाड आदी मान्यवमान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button