Pandharpur

साथीच्या आजारांवर आपण करुयात मात विवेक परदेशी आरोग्य समिती सभापती

साथीच्या आजारांवर आपण करुयात मात
विवेक परदेशी आरोग्य समिती सभापती

प्रतिनिधी रफीक आत्तार

पुर्ण जगभरात कोरोना पासुन आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. नवनवीन शोध लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. बघता बघता उन्हाळा संपला आपण जून महीन्यात पदार्पण केले. खरंतर ८ जुन च्या पुढे पाउस येणार होता. पण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या मुळे कोकण किनारपट्टी , मुंबई मध्ये जोरदार पाउस झाला. वादळ आले व महाराष्ट्रातही विविध ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. पाउस आला कि साथीचे आजार आले. सर्दी, ताप , खोकला, उलटी, जुलाब याला पोषक वातावरण. डेंग्यु , मलेरिया, टायफाईड या आजाराचे राज्य. पण या वर्षा मध्ये आपणास या सर्वांवर मात करावयाची आहे. पंढरपुरातील नामवंत व अनुभवी डॉक्टर मागील बरेच दिवसा पासुन कोरोना व विविध विषयावर मार्गदर्शन देत आहेत. त्यांच्या कडुन बरीचशी माहीती व मुद्दे अवगत झाले. साथीचे आजार व कोरोना यांच्या काही लक्षणा मध्ये साम्य असुन पुढील महीने डॉक्टरांसाठी व पेशंट साठी खुप महत्त्वाचे आहेत. कोणतीही व्याधी जाणवल्यास किंवा आजार झाल्यास मेडिकल मधुन औषधे घेणे चुकीचे असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व मार्गदर्शनानेच औषध उपचार घेणे खुप आवश्यक आहे. साथीचे आजार व कोरोना यामधील महत्त्वाच्या लक्षणामध्ये साधर्म्य असल्याने होणारा आजार साथीचा आहे कि कोरोना आहे हे शोधण्यासाठी पेशंटचे ही सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. पेशंट ने डॉक्टरांशी सर्व माहीती खरी देणे महत्त्वाचे आहे. पेशंटने दिलेली माहिती, पेशंटला होणाऱ्या व्याधी व त्यात वरचेवर होणारे बदल यावर औषध उपचार व ट्रिटमेंट बदलू शकते. नागरिक कोठुन प्रवास करुन आले असतील किंवा कोणाच्या संपर्कात आले असतील तर ही माहीती डॉक्टरांना सांगणे आत्यावश्यक आहे. तरच आपणास योग्य उपचार मिळून आपण लवकरात लवकर बरे होऊ.चांगली व भक्कम जिवनशैली हे साथीच्या आजारावर एक प्रभावी औषध आहे. साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी आपली जिवनशैली चांगली असणे आवश्यक आहे. वेळेवर झोपणे, जागरण टाळणे, पुरेशी झोप घेणे, ताजे, गरम व पौष्टीक जेवण सेवन करणे, जड अन्न टाळणे , वेळेवर जेवण करणे खुप महत्त्वाचे आहे. तसेच मोबाईलचा अती वापर करणे खुप हानीकारक आहे. काही लोक दिवसेंन दिवस मोबाईल वर असतात याचा धोका होऊ शकतो, मानसिकता बिघडु शकते अती मोबाईल वापर खुप धोक्याचे आहे. तसेच चांगल्या व पॉझीटिव गोष्टी वाचाव्यात पहाव्यात चार गोष्टी खुप महत्त्वाच्या आहेत. *व्यायाम , प्राणायाम , योगासन , मेडिटेशन*
दरोजर सकाळी व सायंकाळी यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. वरील गोष्टींचा आपण अवलंब केल्यास नक्की आपणास साथीच्या आजारावर मात करणे सोपे जाईल. घाबरु नका पण जागरुक रहा.
पावसाळा आल्यावर नगरपरिषदेच्या वतीनेही भक्कम उपाययोजना केली जाते. पाणी पुरवठ्याच्या तपासणी पासुन, सार्वजनिक भागात साठलेल्या पाणी साठया मध्ये औषध फवारणी करुन त्यामधील डास व अळ्या मारल्या जातात. स्वच्छते कडे विशेष लक्ष दिले जाते, तसेच आपल्या घरामध्ये आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस साजरा करणे खुप गरजेचे आहे. या दिवशी घरा मधील सर्व पाणी साठे धुवुन स्वच्छ व रिकामे करावे. घरामधील कुलर , फ्रिज, टायर, टेरेसवर भंगार असल्यास त्यामधील पाणी साठे वरचेवर रिकामे कराणे खुप आवश्यक. नागरिक व प्रशासनाने मिळुन काम केल्यास अशक्य काहीच नाही सरकार व प्रशासनाने दिलेल्या माहीती नुसार बरेच लोक असिंमटमॅटीक असु शकतात. म्हणजे त्यांना कोरोना आहे, पण कोणतेही लक्षण नाही. अशा लोकांना शोधणे खुप चॅलेंजीग आहे. त्यामुळे आपण काही सवयी अंगवळणी लावणे खुप गरजेचे आहे. कधीही आपण घरा बाहेर पडताना मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वरचेवर हात धुणे , सॅनिटायझर वापरणे खुप महत्त्वाचे आहे. १९जानेवारी २०२० रोजी सिंगापुर येथे चर्च मध्ये खुप लोक जमले होते, या कार्यक्रमानंतर सिंगापुर मध्ये कोरोनाचा प्रसार वाढला, यांचे कारण शोधल्या नंतर असे कळाले , चिन मधुन सदर कार्यक्रमास एक कपल आले होते, त्यांचेमुळे सिंगापुर मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे कळाले. वास्तविक पाहता चिन मधुन आलेल्या या नागरिकाला कोणतेही कोरोनाचे लक्षण नव्हते पण त्यांची कोव्हीड १९ ची टेस्ट केल्या नंतर ती पॉझीटीव आली. चिन वरुन आलेले हे नागरिक त्यांच्या संपर्कात आल्याने सिंगापुरातील बरेच लोक पॉझिटीव निघायला सुरवात झाली. त्यामुळे आपण जागरुक राहणे गरजेचे आहे. प्रशासन , लोकप्रतिनिधी , नागरिक व डॉक्टर यांच्या प्रयत्नाने निश्चित आपण साथीचे आजारांवर तर मात करुच, कोरोनालाही आपण हरवू. कोरोना वर विविध शोध लावण्याचा प्रयत्न चालु आहे, तंत्रज्ञान खुप प्रगत झाले आहे पुढील काही महीन्यामध्ये निश्चितच आपण या संकटावर मात करु असा मला विश्र्वास आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button