Maharashtra

कोरोना संक्रमण काळात सीना कोळेगाव धरण परिसरात अवैध वाळु उपसा

कोरोना संक्रमण काळात सीना कोळेगाव धरण परिसरात अवैध वाळु उपसा

प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण परिसरात सीना नदिच्या पात्रातुन अवैध वाळु उपसा सुरु आहे .कोरोना संक्रमणामुळे महसुल प्रशासणाचे याकडे दुलर्क्ष होत असल्याने याचा लाभ अवैध वाळु उपसा करणाऱ्यांनी उठवित सीना कोळेगाव धरण परिसरात सीना नदिच्या पात्रातुन वाळु उपसा करून नादित मोठ मोठे खड्डे केले आहेत
परंडा तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असुन यासाठी वाळुची मागणी मोठया प्रमाणात आहे .एका टॅक्टरमध्ये पाऊन ब्रासच वाळु असते त्यासाठी पाच हजार रुपये मोजावे लागत आहे .बांधकाम धारकांना गरज असल्याने ते वाळुसाठी कितीही पैसे मोजण्यास तयार आहेत त्यामुळे वाळु धंदयात खुप पैसे मिळत असल्याने या व्यवसायात अनेकजण उतरले आहेत .
अवैध वाळु उपसा करणारे टॅक्टरमध्ये माती मीश्रीत वाळु उपसा करुन ती नदिपत्रातुन बाहेर अनुन पाण्याने धुतात त्यामुळे त्यातील माती निघुन जाते आणि बांधकाम धारकास ती वाळु पाच हजार रुपयाला विकतात वाळु व्यवसाईक हे एका टॅक्टरमागे तीन चार जणास मोटार सायकलवर ठेवतात ते टॅक्टरच्या मागे पुढे असतात महसुल अथवा पोलिस रस्त्यात आहेत का याचा तपास घेतात व मोबाईल टॅक्टर चालकास माहिती देतात त्याप्रमाणे टॅक्टर चालक गल्ली बोळातुन वाळुने भरलेला टॅक्टर अनतात
सध्या परंड्यात अवैध वाळुचा धंदा तेजीत सुरु आहे . ते रात्री अपरात्री गाडया सुसाट वेगाने धावत असल्याचा आवाज ऐकावयास येत आहे . जड वाहतुकीमुळे रस्त्यांची वाट लागली आहे . बेकायदेशीररित्या होत असलेल्या वाळु उपशामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत . बेकायदेशीर वाळु शामुळे
उपशामुळे पर्यावरणा समतोल ढासळण्यास कारणीभुत ठरत आहे महसुल प्रशासणाने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी आशी मागणी नागरीकातुन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button