Pandharpur

पंढरपूर येथील यामिनी सरदेशमुख -जोशी यांची राज्य परिवहन उपमहाव्यवस्थापक पदी नियुक्ती

पंढरपूर येथील यामिनी सरदेशमुख -जोशी यांची राज्य परिवहन उपमहाव्यवस्थापक पदी नियुक्ती

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर येथील सौ यामिनी सरदेशमुख -जोशी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला असून राज्य परिवहन महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक या मोठ्या जबाबदारी असणाऱ्या पदावर त्यांची पदोन्नती होऊन नियुक्ती करण्यात आली आहे.या पदावर काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील त्या पहिल्याच महिला अधिकारी आहेत. ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून यासाठी यामिनी सरदेशमुख यांचे सोशल मीडियावर अभिनंदन केले जात आहे. पंढरपूर येथील श्री अशोक सरदेशमुख यांच्या त्या द्वितीय कन्या आहेत. यामिनी सरदेशमुख यांचे महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात तर शालेय शिक्षण कवठेकर प्रशाला येथे झाले.लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या यामिनी यांनी बीएस्सी(स्टॅटिस्टिक)शिक्षण घेतले,२००७साली राज्य परिवहन महामंडळाच्या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करून सुरुवातीला इचलकरंजी येथे वरिष्ठ आगार व्यवस्थापक या पदावर कार्य केले. तसेच २००९ते२०१२ या कालावधीत कोल्हापूर-सातारा विभाग येथे विभागीय वाहतूक अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. कऱ्हाड,सातारा आणि बारामती या भव्यदिव्य एस टी स्टँडच्या बांधकामात महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. २०१२ते २०१४ या कालावधीत सातारा येथे विभागीय वाहतूक अधिकारी म्हणून काम पाहिले.तसेच नाशिक येथील कुंभमेळा ,सिंहस्थ पर्वणी साठी २०१४मध्ये त्यांनी अत्यंत कुशलतेने आखणी केली होती,हा मेळावा१२वर्षांनी एकदा होतो आणि लाखो भाविकांची देशभरातुन गर्दी होत असते. पुणे विभाग नियंत्रक या पदावर पुणे येथे२०१८ते२०२०या कालावधीत काम पाहिले. सौ यामिनी सरदेशमुख यांच्या कुशल कामगिरीमुळे मुंबई सेंट्रल राज्य परिवहन मंडळाच्या उपमहाव्यव स्थापकपदी नियुक्ती करण्यात आली असून ही पोस्ट सुपर क्लास वन कॅटेगरी मध्ये येते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button