Pune

रेवणनाथ गव्हाणे यांची शिवसंग्रामच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

रेवणनाथ गव्हाणे यांची शिवसंग्रामच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: इंदापूर तालुक्यातील पडस्थळ येथील रेवणनाथ अर्जुन गव्हाणे महाराष्ट्र प्रदेश शिव संग्राम संघटनेच्या इंदापुर तालुका अध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली आहे .

पुणे जिल्हाचे अध्यक्ष वसंतराव साळुंके यांच्या स्वाक्षरीने त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले . रेवणनाथ गव्हाणे यांच्या नियुक्ती झाल्यानंतर त्यांना सामाजिक व राजकीय स्तरातून त्यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचार आत्मसात संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी गव्हाणे हे यशस्वी प्रयत्न करतील. शिवाय संघटनेचा अधिक विस्तार करून दिलेली जबाबदारी निष्ठेने प्रामाणिकपणे पार पाडतील या उद्देशाने त्यांची निवड करण्यात आल्याचं नियुक्ती पत्रात नमूद केले आहे .

नियुक्ती पत्र देते वेळी जिल्हा अध्यक्ष वसंतराव साळुंके दौंड तालुका अध्यक्ष संजय शिंदे मंगेश डोंगरे अमर जगदाळे बापु जामदार आबासाहेब राखुंडे मनोज मोरे प्रशांत पाटील प्रविण पवाय आश्रम फडतरे किशोर पवार प्रकाश खंबासवाडकर सतिश भोसले सतिश खंबासवाडकर युवराज माने रौनक बागरेचा व गव्हाणे यांचे इतर तरूण सहकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button