Rawer

श्रीचक्रधर गुरूकूल संस्कृत महाविद्यालयाच्या लिपिक पदावर प्रदिप महाराज पंजाबी खिर्डी यांची नियुक्ती

श्रीचक्रधर गुरूकूल संस्कृत महाविद्यालयाच्या लिपिक पदावर प्रदिप महाराज पंजाबी खिर्डी यांची नियुक्ती

खिर्डी प्रतिनिधी:-प्रविण शेलोडे

महानुभाव संप्रदायातील प्रतिष्ठित असणारी श्री चक्रधर गुरूकूल विद्या प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेची त्रैमासिक विश्वस्त सभा दिनांक 1-2-2022मंगळवार रोजी सकाळी 11-00 वा.संस्थेच्या कार्यालयात श्री चक्रधर गुरूकूल विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री वसंत विश्वनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सर्व प्रथम कै.आचार्य श्री मोठे बाबा आंबे वडगाव कै.तु.वि.गेडाम साहेब ,कै.दिवाकरमुनी आराध्य कै.सिंधूताई सपकाळ कै.म.जायराजबाबा कारंजेकर कै.डोळसकरबाबा कै.इंदूबाई साळकर आदी कै.आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली यात प्रामुख्याने फैजपूर येथे किर्तन विद्यालय स्थापन करणे ,पैठण येथील संत विद्यापीठाचा अभ्यासक्रम राबविणे, संस्कृत शिबिर आयोजित करणे ,नूतन इमारतीचे उद्घाटनाची रूपरेषा ठरविणे , संस्कृत शास्त्री संमेलन भरविणे ग्रंथालयाचे नूतनीकरण करणे .या सर्व विषयांवर चर्चा झाली.श्रीचक्रधर गुरूकूल संस्कृत महाविद्यालयाच्या रिक्त झालेल्या लिपिक पदावर म. ई.श्री.प्रदिपराज पंजाबी खिर्डी यांची नियुक्ती करण्यात आली. सदर प्रसंगी आचार्य म.श्री मानेकरबाबा शास्त्री , प्राचार्य म.श्री राजधर बाबा शास्त्री ,म.दिवाकरबाबा शास्त्री म.श्री.जिंतूरकरबाबा शास्त्री, म.श्री चोरमांगेबाबा शास्त्री ,संस्थेचे उपाध्यक्ष, श्री उल्हास दादा चौधरी श्री राजाराम गणू महाजन श्री हेमंत प्रल्हाद नेमाडे प्रा. म.मुरारिव्यासबाबा,म.श्री मधुसूदन शास्त्री मराठे ,म.श्रीराजकूमारदादा पुजदेकर ,म.राजूदादा जिंतूरकर म.गोपालदादा भोजने आदी संत महंत सद्भक्त उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button