Parola

भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष पदी जितेंद्र चौधरी. यांची नियुक्ती

भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष पदी जितेंद्र चौधरी. यांची नियुक्ती
कमलेश चौधरी पारोळा
पारोळा : तालुक्यातील मुंदाणे प्र अ येथील नानासो ए टी पाटील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व पारोळा शहराचे रहिवाशी जितेंद्र आंनदा चौधरी यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाअध्यक्ष तथा आमदार राजू मामा भोळे यांनी त्यांना तसे नियुक्ती पत्र दिले आहे. गेल्या सहा वर्षा पासून ते पारोळा तालुका भाजप शिक्षक आघाडीचे तालुका अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत. या काळात त्यांनी वेळोवेळी पक्ष आदेश व शिक्षकांच्या विविध समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने केली आहेत. त्यांच्या कार्याची दखल पक्षाने घेऊन त्यांची शिक्षक आधाडीच्या जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. जिल्हाअध्यक्ष पदावरून शिक्षकांचे विविध प्रश्न, समस्या, अडचणी सोडविण्यासाठी व न्याय हक्कासाठी सदा तत्पर राहू तसेच वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून शिक्षकांना न्याय मिळवून देऊ असे सुतावाच या नियुक्ती प्रसंगी त्यांनी दिले आहेत. दरम्यान जितेंद्र चौधरी यांच्या जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्तीचे माजी मंत्री गिरीश महाजन, माजी खासदार ए टी पाटील, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, ऍड किशोर काळकर, प्रदेश उप अध्यक्ष स्मिता वाघ, भाजप शिक्षक आघाडी प्रदेश अध्यक्ष कल्पना पांडे, जिल्हा उप अध्यक्ष रेखा चौधरी, जि प अध्यक्ष रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील सह जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार, नगराध्यक्ष करण पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, तालुका अध्यक्ष ऍड अतुल मोरे यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button