Faijpur

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी भानुदास भारंबे तर जिल्हा संघटक पदी कैलास लवगंडे यांची नियुक्ती….

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या
जिल्हा उपाध्यक्ष पदी भानुदास भारंबे तर जिल्हा संघटक पदी कैलास लवगंडे यांची नियुक्ती….

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पाल ,तालुका रावेर येथे दि,3 रोजी महत्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी भानुदास भारंबे ,सावदा.तर जिल्हा संघटक पदी कैलास लवगंडे. सावदा,यांची नियुक्ती करण्यात आली, सदर नियुक्ती पत्र उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या हस्ते देण्यात आले, उपाध्यक्ष विभागीय भूषण महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, यांच्या विशेष उपस्थितीत जिल्हाध्यक्ष प्रदिप गायके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या वेळी विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यांत त्यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटन ध्येयधोरणे सभासद वाढवणे व संघातर्फे समाजोपयोगी उपक्रम, तसेच रावेर तालुका पत्रकार
संघटनेची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे नमूद करून
सर्व रावेर तालुका पत्रकार बंधू प्रती आभार व्यक्त केले,
तर पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि एप्रिल महिन्याच्या अखेरीस खिरोदा येथे रावेर विधानसभा क्षेत्रातील सर्व पत्रकार बंधूंचा मेळाव्याचे आयोजन करावे
या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल,
सल्लागार सरदार पिंजारी,
कोषाध्यक्ष रविंद्र महाजन, गणेश पाटील,प्रमोद कोडे , महेंद्र पाटील,अजिज शेख, शरीफ शेख ,सुरेश पवार, मनिष चव्हाण, पुनमचंद जाधव, गणेश भोई, मनिष बाविस्कर, लक्ष्मण ठाकूर सर, सावदा पत्रकार संघ,अध्यक्ष युसूफ शहा, शेख फरीद, हमीद तडवी, वैभव काटकर, सह अनेक रावेर तालुक्यातील पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर यावेळी सूत्रसंचालन संतोष नवले , प्रास्ताविक योगेश सैतवाल यांनी तर आभार शरीफ शेख यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button