Chalisgaon

ब्राम्हणशेवगे येथे नागरिकांच्या सतर्कतेने काळवीटाचे वाचले प्राण:कुत्र्यांच्या हल्यात जखमी काळवीटाला दिले वनकर्मचार्याच्या ताब्यात

ब्राम्हणशेवगे येथे नागरिकांच्या सतर्कतेने काळवीटाचे वाचले प्राण:कुत्र्यांच्या हल्यात जखमी काळवीटाला दिले वनकर्मचार्याच्या ताब्यात

सोमनाथ माळी चाळीसगाव

चाळीसगाव : ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव शिवारात हरणाचा व ईतर वन्य प्राण्यांचा वावर आहे. शिवारात सध्या मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे तसेच शेतात रब्बी पिके उभी आहेत.मार्चच्या उन्हाचा तडाखा वाढला असल्याने पाझर तलावाकडे पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणाच्या कळपातल्या काळवीटामागे जंगली कुत्रे पाठलाग करत असताना भीमराव पवार यांचे शेतालगत हिरापूर-ब्राम्हणशेवगे या डांबरी रस्ता ओलांडत असताना पाय घसरल्यामुळे मागचा पाय मुडल्यामुळे पळता न आल्यामुळे कुत्र्यांनी हल्ला करुन मागच्या पायाला चावा घेऊन जखमी केले. एवढ्यात शेतातून घराकडे जात असलेले मा.सरपंच ज्ञानेश्वर राठोड, निलेश राठोड, बळीराम चव्हाण व शेतात काम करत असलेले राजू पवार यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले व जखमी काळवीटाला रस्त्यालगत असलेल्या जगताप यांचे पोल्ट्रीफार्म वर आणून प्राथमिक उपचार करून वनविभागाला संपर्क करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते लोकसंघर्ष मोर्चा चे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी यांना संपर्क साधला. सोमनाथ माळी यांनी वनविभागाचे कर्मचारी संजय जाधव तसेच वन्यजीव मानद सचिव राजेश ठोंबरे यांना संपर्क साधला. त्यांनी लागलीच वनविभागाचे शितोळे व चार कर्मचारी वाहन घेऊन ब्राम्हणशेवगे येथे पोहोचले व काळवीटाला उपचारासाठी चाळीसगाव येथील वनविभागच्या कार्यालयात आणले.
ब्राम्हणशेवगे येथील नागरिकांनी सतर्कता दाखवली तसेच वनविभागाने व राजेश ठोंबरे यांनी तात्काळ दखल घेतली त्यामुळे काळवीटाचे प्राण वाचले त्यामुळे सोमनाथ माळी व नागरिकांनी त्याचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button