Nandurbar

अजून एका आदिवासी स्त्री व्यवस्थेचा बळी..!बंद घाट..! पत्नी खांद्यावर.. पतीची पायपीट..मात्र वाटेतच सोडले महिलेने प्राण..!

अजून एका आदिवासी स्त्री व्यवस्थेचा बळी..!बंद घाट..! पत्नी खांद्यावर.. पतीची पायपीट..मात्र वाटेतच सोडले महिलेने प्राण..!

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसात दरड कोसळून मार्ग बंद झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच महिलेचा तडफडून अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदुरबारमधील चांदसैली येथील ही घटना आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नंदुरबारमधील चांदसौली येथे मुसळधार पावसात दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे या परिसरातील घाट रस्ता बंद झाला आणि परिणामी नागरिकांना शहराकडे जाण्यासाठी पायी मार्गच शिल्लक राहीला. सिदलीबाई पाडवी ही महिला आजारी असल्याने तिला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते मात्र, रस्ताच बंद असल्याने शेवटी त्यांच्या पतीने आपल्या खांद्यावर टाकून पायपीट सुरू केली.

आपल्या पत्नीला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी पतीची पायपीट सुरू होती पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. कारण, सिदलीबाई यांनी वाटेतच प्राण सोडले. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button