यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा-अ भा आदिवासी विकास परिषदची मागणी

यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा-अ भा आदिवासी विकास परिषदची मागणी

रुस्तम शेख

यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीच्या संदर्भात अ भा आदिवासी विकास परिषद जिल्हा शाखा यवतमाळ च्या वतीने मा राज्यपाल साहेब म रा मुंबई यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यात अवकाळी पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन मुख्य पिकासह ज्वारी, तूर तसेच भाजीपाला इत्यादी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे ,त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळची परिस्थिती निर्माण झाली आहे .

आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तीस हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती निवेदनात केली आहे .

निवेदन देते वेळी अ भा आदिवासी विकास परिषद जिल्हा अध्यक्ष नरेश गेडाम , राजू चांदेकर ,किशोर उईके, प्रकाश कुमरे ,पांडुरंग आत्राम, राजेश मडावी ,आकाश तोडसाम, निळकंठ तोडसाम, राजु केराम,डॉ विनोद डवले , तुषार आत्राम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button