Nashik

बजाज फायनान्स कॅपिटल फायनान्स होम क्रेडिट फायनान्स तसेच अन्य फायनान्स कंपन्यावर कठोरात कठोर कारवाई करून बंद करा अनिलभाई गांगुर्डे याची मागणी.

बजाज फायनान्स कॅपिटल फायनान्स होम क्रेडिट फायनान्स तसेच अन्य फायनान्स कंपन्यावर कठोरात कठोर कारवाई करून बंद करा अनिलभाई गांगुर्डे याची मागणी

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे साहेब यांची भेट घेऊन फायनान्स कंपनी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्यासाठी ञास देत आहे वरील विषयाचे निवेदन दिले

नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रात धुळे जळगाव नगर नंदुरबार भागात अनेक कंपन्या कार्यरत असून नागरिकांनी ग्राहकांनी मोबाईल टीव्ही फ्रिज इत्यादी वस्तूवर वरील कंपन्यांकडून लोन घेतले आहे परंतु सध्या भारतात तसेच जगात करुणा चे थैमान घातले असून लोकांना काम धंदा नाही तरी या कंपन्यांचे रिकवरी करणारे एजंट लोकांना नाहक त्रास देत असून फोन मार्फत धमक्या देतात अशा कंपन्या ना समज देऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी आरपीआय आठवले पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे यांनी केली.

याप्रसंगी रिपाईचे राज्य उपाध्यक्ष डॉ. स्वामी वैदू , मुंबई प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ गायकवाड,राज्य नेते विश्वासजी जगताप, मा.ताय्यपा, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button