Nashik

मागासवर्गीया वरील अन्याय अत्याचार थांबवा ,रिपाई चे विभागीय आयुक्तांना साकङे. अन्यथा तिव्र आंदोलन-अनिलभाई गांगुर्डे

मागासवर्गीया वरील अन्याय अत्याचार थांबवा ,रिपाई चे विभागीय आयुक्तांना साकङे. अन्यथा तिव्र आंदोलन-अनिलभाई गांगुर्डे

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : आज दिनांक 24/8/2021 मंगळवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शाखेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे महसूल आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन वरील विषयांतर्गत निवेदन देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्या मधील वणी खुर्द ह्या गावात दलित महिला वृद्धांना भरचौकात खांबाला बांधून अमानुषपणे मारहाण केली असून संपूर्ण गावात भीती व दहशतीचे वातावरण पसरले आहे त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यातील बोरगावात एका मांतग समाजातील कार्यकर्त्याचा शव सार्वजनिक स्मशानभूमीत जाळू देण्यात मज्जाव करण्यात आला वरील दोन्हीही घटना जातीयवादातून घडल्या आसून संबंधितांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली.

याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अनिलभाई गांगुर्डे, नाशिक उप जिल्हाप्रमुख मा.सुनिलभाई यशवंते, नाशिक जिल्हा नेते मा.गोटीरामजी पवार,नाशिक जिल्हा संघटक मा.प्रशांतजी भालेराव,युवा नेते सागरभाऊ काळे,युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button