Amalner

लोण सिम येथील अंगणवाडी सेविकेचा केला विनयभंग.. एकाविरूद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल…

लोण सिम येथील अंगणवाडी सेविकेचा केला विनयभंग..
एकाविरूद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल…

अमळनेर:- तालुक्यातील लोण सिम येथील अंगणवाडी सेविकेचा हात पकडुन विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोण सिम येथील २७ वर्षीय अंगणवाडी सेविकेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, सदर अंगणवाडी सेविकेस गावातील नितीन केशवराव पाटील हा नेहमी त्रास देत होता. त्याच्या आईला याबद्दल सांगितले असता तू राजीनामा ठेवून माहेरी निघून जा असे उत्तर त्यांनी दिले होते. दि. १९ ऑगस्ट रोजी गावात पालखी निघाली होती. सदर महिला तिच्या सासू सासऱ्यांसह जात असताना नितीन केशवराव पाटील याने सदर अंगणवाडी सेविकेचा हात धरला व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून अंगावर ओढू लागला. यावेळी सासू सासरे आवरण्यास गेले असता त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून मारवड पोलिसात भादवि कलम ३५४, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो विशाल चव्हाण करीत आहेत.

संबंधित लेख

Back to top button