Jalgaon

नविन मोबाईल आणि पोषण ट्रॅकरची भाषा मराठी करण्यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे साकडे

नविन मोबाईल आणि पोषण ट्रॅकरची भाषा मराठी करण्यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे साकडे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी खासदार रक्षाताई खडसे यांच्याशी खालील मागण्यांबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा करण्यात आली.
मागण्या
१)अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी मोबाईल फोन दिलेले आहेत. परंतु सदरचे फोन निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे नादुरुस्त होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून मोबाईल दुरुस्तीसाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागत आहेत. परिणामी अंगणवाडी सेविकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या बाबींचा विचार करून अंगणवाडी सेविकांना अद्यावत तसेच जास्त क्षमता असलेले नवीन मोबाईल फोन तात्काळ पुरविण्यात यावेत.

२)मध्यवर्ती सरकारने अंगणवाडी केंद्राच्या कामकाजासाठी विकसित केलेले पोषण ट्रॅकर एप्लीकेशन सदोष असून त्यामध्ये अनेक तांत्रिक त्रुट्या आहेत तसेच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन मध्ये माहिती भरण्याची भाषा इंग्रजी आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करता त्यांना इंग्रजी भाषे ची माहिती भरण्यात अनेक अडचणी येत आहेत परिणामी अंगणवाडी केंद्राच्या कामकाजात अडथळे व खोळंबा निर्माण होत आहे तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन मध्ये माहिती भरण्याची भाषा इंग्रजी ऐवजी त्या त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेत माहिती भरण्याची व्यवस्था करण्यात यावी.

३) देशातील अंगणवाडी कर्मचारी दररोज साडेचार तासांपेक्षा अधिक काम करतात म्हणून त्यांचे आठ तास मोजून त्यांना शासकीय/ निम शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन,भत्ते आणि सेवेचे अन्य फायदे तात्काळ लागू करण्यात यावेत.

४) मध्यवर्ती सरकारने सन २०१८ मध्ये सेविका-३०००/- ,मदतनिस-१५००/- आणि मिनी अंगणवाडी सेविका-२२५०/-इतके अत्यल्प मानधन दर महा अदा करते. आम्ही मागणी करीत आहोत की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन आणि भत्ते लागु करण्यात यावेत.

५)अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर बाबी चा विचार करून अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करण्यात यावे.

६) अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सेवेत कार्यरत असताना अकाली निधन झाल्यास त्यांच्या रिक्त जागेवर अनुकंपा तत्त्वानुसार पात्र वारसांना थेट सेवेत सामावून घ्यावे.

७) मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यात यावे तसेच मदतीस पात्र नसलेल्या अंगणवाडी केंद्रात सेविकेच्या रिक्त पदावर मिनी अंगणवाडी सेविकांना थेट सेविका म्हणून पदोन्नती देण्यात यावी.
या सह अन्य मागण्या मध्यवर्ती सरकारने मंजूर कराव्यात म्हणून चर्चा करण्यासाठी संघटनेच्या अध्यक्षा माया ताई परमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची त्यांच्या कोथळी येथील निवासस्थानी भेट घेतली. सदर भेटीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वरील मागण्या सोडविण्यासाठी मा. पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी तसेच केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मा.श्रीमती स्मृती इराणी यांच्याशी संघटनेच्या शिष्टमंडळाची आपल्या नेतृत्वाखाली भेट घडवून आणावी अशी मागणीही चर्चे्अंति करण्यात आली.
यावर मा. पंतप्रधान आणि मा. केंद्रीय महिला बालविकास मंत्री यांना पत्र देऊन शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्याबाबत सकारात्मक प्रयत्न केला जाईल तसेच भेटीबाबत संघटनेला अवगत केले जाईल असेही रक्षाताई खडसे यांनी उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीनां आश्वासित केले.

सदर शिष्टमंडळात रामकृष्ण बी. पाटील यांच्यासह रावेर लोकसभा मतदार संघातील सविता महाजन, संगीता निंभोरे, चेतना गवळी, द्वारका बोंडे, छाया साळुंखे, शकुंतला चौधरी, रेखा नेरकर, रजनी बोंडे, सरला पाटील, भारती पाटील, सरला कोलते, वैशाली निंभोरे, शोभा गोरे, सुवर्णा पाटील, वैशाली कोळी,अल्का खैरनार यांच्यासह आदी अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button