Amalner

आणि जेंव्हा पोलीस ठाण्याचा दुरध्वनी बंद असतो तेंव्हा..!

आणि जेंव्हा पोलीस ठाण्याचा दुरध्वनी बंद असतो तेंव्हा..!

अमळनेर येथील पोलीस ठाण्याचा दूरध्वनी गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे.अमळनेर पोलीस ठाण्यातील ह्या दूरध्वनी चा नेहमीच प्रॉब्लेम असतो.अनेक वेळा हा दूरध्वनी लागत नाही. या संदर्भाच्या अनेक तक्रारी अमळनेर पोलीस निरीक्षक, सहा पोलीस अधीक्षक यांना वारंवार तोंडी स्वरूपात करण्यात आल्या आहेत. पण ह्या संदर्भात कोणतीही ठोस पाऊले न उचलता हा दूरध्वनी दुरुस्त केला जात नाही. आता अगदी तातडीच्या घटना घडल्या तर सामान्य जनतेने कोठे फोन करून घटनेची तक्रार करावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रत्येक वेळी शिफ्ट नुसार ठाणे अंमलदार बदलत असतात अश्या वेळी कोणाला कशी तक्रार देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच पोलीस ठाणे हे गावापासून 3 की मी अंतरावर आहे.

इतक्या दूर जाण्यास अनेक लोकांना त्रास होतो. त्यात पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद असतो त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. लवकरात लवकर दूरध्वनी बदलावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button