Amalner

आणि आमदारांवर ओढवली नामुष्की…भूमिपूजन न करताच फिरावे लागले माघारी…वाचा सविस्तर मारवड येथील घटना..

आणि आमदारांवर ओढवली नामुष्की…भूमिपूजन न करताच फिरावे लागले माघारी…वाचा सविस्तर मारवड येथील घटना..

अमळनेर तालुक्यातील मारवड येथे भूमी पूजनांच्या कार्यक्रमां ना गेलेल्या विद्यमान आमदारांना भूमी पूजन न करताच माघारी फिरण्याची वेळ आली आहे. मारवड येथे स्मशान भूमीचे भूमीपूजनाचे कामाला लागले मोठे ग्रहण .आमदार व जिल्हा परिषद सदस्य यांना परिसरातील महिलांनी काम सुरू करणेस विरोध दाखवून माघारी परत पाठवले आहे.या घटनेची जोरदार चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की मारवड ग्राम पंचायतला स्मशानभूमी व अभ्यासिका चे भूमिपूजन करण्यासाठी विद्यमान आमदार सपत्निक जिल्हा परिषद सदस्या करण्यासाठी गेले होते. दोन्ही कामांसाठी सुमारे बावीस लाख रुपयांचे काम मंजूर होते. मात्र मारवड गावासाठी नवीन जागेवर स्मशान भूमी बांधण्यासाठी गावातील एका खाजगी दात्याने एक एकर जागा मोफत दिली. परंतु गावातील काही असंतुष्ट लोकांनी त्या ठिकाणी विरोध केला होता. त्यामुळे ग्राम पंचायत ने सरकारी जागेवर बांधकाम करण्याचे ठरविले.मात्र त्या ठिकाणी लोक वस्ती असल्याने तेथील नागरिकांनी विरोध केला.लोक वस्ती असलेल्या ठिकाणी स्मशानभूमीचे भूमिपूजन करू नये ते योग्य आहे का? आम्ही तुमच्या बंगल्यात येऊन राहावे का? वस्तीत कोणी स्मशानभूमी बांधत का? असा प्रश्न करत गावातील महिला व पुरुषांनी विरोध दर्शविला आहे.आणि आमदार व जिल्हा परिषद सदस्य यांना भूमिपूजन न करताच परत माघारी फिरावे लागले आहे.

तसेच मारवड गावचे लोकनियुक्त सरपंच यांचे नियोजन शून्य कारभारामुळे गावात भूमीपूजना विषयी मोठे वाद निर्माण झाल्याने भूमिपूजन न करता माघारी फिरल्याने नामुष्कीची वेळ आली की काय अशी चर्चा मारवड गावा बरोबर च संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. तसेच एकीकडे परिसरात मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि मारवड गावाचे सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य करते ढोल ताष्याने आमदार व त्यांचे धर्म पत्नीचे स्वागत केले या विषयी शेतकरी जनता आयोजकांवर मोठी नाराज झाली.एव्हढच नव्हेतर शेवटी ग्रामपंचयात कार्यालयात स्वागत कार्यक्रमाकडे लोकांनी पाठ फिरविली.लोक ह्या स्वागत कार्यक्रमास थांबले नाहीत. काल शनिवारी मारवड चा बाजार असतो खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते.पण एवढ्या मोठ्या बाजरपेठ गावातील मोजून तीस चाळीस लोक उपस्थित होते. एक आमदार जेंव्हा एखाद्या गावात जातात तेंव्हा त्यांच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते कारण ते तालुक्याचे सर्वे सर्वां असतात.पण इथे मात्र आमदारांच्या स्वागताला अत्यन्त मोजके लोक उपस्थित होते यावरून विद्यमान आमदार हे जनतेत लोकप्रिय नाहीत.लोक त्यांच्यावर नाराज आहेत हे चित्र स्पष्ट झाले आहे.

ही गोष्ट ही नामुष्कीची मानावी लागेल. लोकांनी आमदारां विषयी नाराजी कालच्या कार्यक्रमतच दाखवून दिली आहे. शेवटी दुष्काळाचा सामना शेतकऱ्यालाच करावा लागेल की काय असे परिसरातील शेतकऱ्यांना वाटतं आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या आणि कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी मारवड येथे भेट दिली आणि लोकांची समस्या जाणून घेतली.यावेळी मात्र गावकरी,शेतकरी आणि लोकांनी आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या आहेत.गोवर्धन ह्या छोट्या गावातून

जवळजवळ 3 ते 4 तास गावकरी आणि शेतकरी यांच्याशी चर्चा केली आहे.32 गावांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेन.7 ते 8 दिवसात जर हा प्रश्न सुटला नाही तर शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट देऊन सदर विषय तात्काळ सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button