Amalner

?️ Big Breaking..अमळनेरात आता होणार जलद गतीने कोरोना चे निदान..कोव्हीड रॅपिड अँटीजन टेस्टिंग सेंटर ची मिळाली मान्यता…

?️ Big Breaking..अमळनेरात आता होणार जलद गतीने कोरोना चे निदान..कोव्हीड रॅपिड अँटीजन टेस्टिंग सेंटर ची मिळाली मान्यता…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर शहरात आणि तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.स्वॅब घेतल्या नंतर तो जळगांव येथे पाठवून अहवाल येण्यास 4 ते 5 दिवस लागतात. तो पर्यंत संशयित रुग्ण कोव्हीड केअर सेंटर ला विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची देखभाल करावी लागते. यासाठी स्वॅब तपासण्याची प्रक्रिया गतिमान होणे गरजेचे आहे. याच
पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद नवी दिल्ली (आयसीएमआर) ने येथील प्रताप महाविद्यालयातील कोविड
केअर सेंटरला “कोविड रॅपिड अँटीजन टेस्टिंग सेंटर”ची मान्यता दिली आहे. यामुळे अवघ्या अर्ध्या तासातच कोरोनाचे निदान होणार असल्याने नागरिकांची सोय होणार आहे.
जिल्ह्यातील हे पहिलेच केंद्र अमळनेर येथे कार्यान्वित झाले असून आता प्रत्येक तालुक्यावर अशी केंद्र स्थापित होणार आहेत. यामुळे
रुग्णांची धावपळ आणि स्ट्रेस कमी होणार आहे. प्रशासनालाही याची मोठ्या प्रमाणात मदत होणार असून केवळ काही तासातच संशयित रुग्ण घरी परत जाऊ शकणार आहे. यामुळे विलगीकरण कक्ष आणि त्यावर होणारा खर्च कमी होणार असून प्रशासनाचीही धावपळ कमी होणार आहे.

तालुक्यातील कोरोनाचा साखळी तुटावी; या हेतूने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे, हृदयरोग तज्ञ डॉ. संदीप जोशी व डॉ. आशिष पाटील यांनी भारतीय आयुर्विज्ञान
संशोधन परिषदकडे नोंदणी करून प्रस्ताव पाठवला. कागदपत्राचा योग्य पाठपुरावा केल्याने अवघ्या तीनच दिवसात रॅपिड अँटीजन टेस्टिंग सेंटर”ला मान्यता मिळाली.

म्हणूनच सद्यस्थितीत राज्य शासनाने 200 रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचे किट उपलब्ध करून दिले आहेत. किटमधून प्रताप महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये दाखल कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचे टेस्टिंग
केले जाणार आहे. यामुळे संस्थात्मक विलगीकरण करण्यास मदत होणार असून निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना तात्काळ घरी
जाता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले रुग्णांचे स्वॅब उशिराने येत असल्यामुळे रुग्णसंख्या वाढत होती. वाढत्या संख्येला ब्रेक लागावा यासाठी ही टेस्ट उपयोगात
येणार आहे. हे सेंटर मिळाल्याने येथील जास्तीचे अहवाल लवकर प्राप्त होणार आहेत.

रॅपिड अँटीजन टेस्ट

नेहमीप्रमाणे रुग्णांचे स्वब ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करून घेतले जात होते. त्याचे अहवाल जळगाव किंवा धुळे प्रयोग शाळेत पाठवावे लागत होते व अहवाल मिळण्यास दोन-तीन दिवस
लागत होते. मात्र रॅपिड अँटीजन टेस्ट किटमुळे अवघ्या अर्ध्या तासात स्वबचा अहवाल प्राप्त होणार आहे. 31 अहवाल मिळाले तात्काळ प्रायोगिक तत्त्वावर रॅपिड अँटीजन टेस्टने सोमवारी सहा जणांची चाचणी करण्यात आली. त्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह तर चार निगेटिव्ह आले. आज खऱ्या अर्थाने हे केंद्र कार्यान्वित झाले. आज (ता.14) 25 जणांची रॅपिड अँटीजन टेस्टने चाचणी करण्यात आली. त्यात 4 रुग्ण पॉझिटिव्ह तर 21 निगेटिव्ह आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button