Bollywood

आणि डान्स 6 च्या सेट वर गोल्डन बॉय नीरजने फेकला प्रेमाचा भाला..!पहा कोणाला केलं प्रपोज..!

आणि डान्स 6 च्या सेट वर गोल्डन बॉय नीरजने फेकला प्रेमाचा भाला..!पहा कोणाला केलं प्रपोज..!

मुंबई टोकियो ओलंपिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून इतिहास रचणारा नीरज चोप्रा प्रसिद्धी च्या शिखरावर आहे.सुवर्णपदक जिंकल्यापासून सर्वच तरुणाईच्या गळ्यातला तो ताईत बनला आहे. विशेषतः मुलींना त्याची पर्सनालिटी,लूक आणि त्याची एकंदरीत त्याच्या बॉडी फिटनेस ह्या सर्वच बाबतीत प्रेमात आहेत.

नुकताच नीरज एका वेगळ्या आणि हटके कारणास्तव चर्चेत आहे ते म्हणजे त्याने एका सेलिब्रिटी मुलीला प्रपोज केलं आहे आणि हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. यामुळे विविध प्रकारच्या चर्चांना उत आला आहे तर तरुणींचे दिल मात्र तुटले आहे.भन्नाट प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

या बाबतीत सविस्तर माहिती अशी की स्टार प्लस वरील डान्स प्लस 6 ह्या रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला आणि तिथे त्यानं चक्क त्या शोच्या परीक्षकालाच प्रपोज केलं.हा व्हिडीओ व्हायरल झाला असून येत्या आठवड्यात शो चा हा भाग लवकरच प्रसारित होईल.नीरजने डान्स प्लस 6 ची परीक्षक शक्ती मोहन हिला सेटवर सर्वांसमोर प्रपोज केलं.
सुंदर आणि डान्सची क्वीन शक्तीला अनेकांनी आतापर्यंत प्रपोज केलं आहे. पण या वेळी गोल्डन बॉयनेही तिला प्रपोज केल्याने चर्चा वाढली आहे.
भालाफेक करण्यात तरबेज असणाऱ्या नीरज चोप्रा स्वतःच घायाळ झाला असून शक्तीला पाहताच त्याने चक्क तिला सेटवर सर्वांसमोर प्रपोज केले.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button