Amalner

आणि दिड वर्षाच्या चिमुकल्या मुलीला जीवदान मिळाले..हिंमत च्या हिम्मतीने वाचले चिमुकली चे प्राण..!

आणि दिड वर्षाच्या चिमुकल्या मुलीला जीवदान मिळाले..!हिंमत च्या हिम्मतीने वाचले चिमुकली चे प्राण..!

अमळनेर सिंगर उर्फ राधिका वय वर्ष दीड वर्ष पावरा कुटुंबातील मुलगी आपल्या शेतावर मोल मजुरीसाठी आलेलं हे कुटूंब गेल्या चार पाच दिवसापासून आपल्याच शेतावर वास्तव्यास आहे. काल सकाळी मी शेतावर गेलो कापसाला ठिबकने खत देत असतानाच अचानक जोरजोरात आवाज यायला लागला धावत पळत शेडवर गेलो पाहतो तर काय ही चिमुकली हौदाच्या पाण्यात पडली होती, तिच्या आईने तिला बाहेर काढली मुलगी जवळजवळ गेल्यातच जमा होतो मी मुलगी माझ्या हातात घेतली पाहतो तर मुलीचा श्वास थांबला होता, नाडी लागत नव्हती. मी कोणतीही वेळ न दडवता मुलीच्या नाका तोंडातून गेलेले पाणी बाहेर काढून मुलीला CPR देणे सुरु केले परंतु प्रतिसाद मिळत नव्हता पुन्हा पुन्हा प्रयत्न केले अखेर मुलीने श्वास घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर मी वेळ न दडवता लगेच गाडी काढून मुलीला अमळनेर ला दवाखान्यात निघालो मित्रांनो माझे शेत ते अमळनेर अंतर 7 किमी परंतु हेच अंतर मला खूप मोठे वाटत होते, गाडी भरधाव चालवत डॉ विशाल बडगुजर यांच्या हॉस्पिटल ला मुलीला दाखल केले.

डॉ विशाल यांनी लगेचच उपचार सुरु करून सांगितले सर काळजी करू नका, बच्चू आता चांगली आहे सर तुम्ही योग्य वेळी होतात म्हणून मुलगी वाचली .त्याच दवाखान्यात आमची धावपळ पाहून सारबेटे येथील रहिवाशी राष्ट्र्पती शौर्य पदक विजेते एपीआय योगेश पाटील माझ्याजवळ आलेत व म्हणाले सर तुम्ही खरंच खूप छान काम केले काहीही मदत लागली तर सांगा. मुलगी वाचवण्यात यश आल्याचे खूप मोठे समाधान मिळाले डॉ विशाल बडगुजर यांचे खूप खूप आभार..हिम्मत सूर्यवंशी बस स्थानका च्या मागे रा अमळनेर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button