Gujrat

आणि 70 वर्षाच्या महिलेने दिला निरोगी मुलाला जन्म..!

आणि 70 वर्षाच्या महिलेने दिला निरोगी मुलाला जन्म..!

गुजरातच्या कच्छच्या रापर तालुक्यातील केमोरा गावात एका 70 वर्षीय महिलेने मुलाला जन्म दिला आहे. लग्नाच्या 45 वर्षानंतर त्यांना मूल झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. 70 वर्षांच्या महिलेने एका निरोगी मुलाला जन्म दिला आहे.एका वृद्ध अशिक्षित जोडप्याने लग्नाच्या 45 वर्षानंतर वैज्ञानिक तंत्रज्ञानाद्वारे म्हणजेच IVF द्वारे मुलाला जन्म दिला आहे.
डॉ नरेश भानुशाली यांनी ही केस हाताळली. ह्या जोडप्याचे वय खूप होते.त्यांना मूल होण्याची कोणतीही आशा नव्हती.
माहिती देताना डॉ नरेश भानुशाली म्हणाले की, जोडप्याने सांगितले की आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना मोठ्या वयात निकाल मिळाले आहेत. हे लोक म्हणाले की तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा, मग आमचे नशीब. वृद्ध महिलेने टेस्ट ट्यूब बेबी असलेल्या मुलाला जन्म दिला आहे.

Leave a Reply

Back to top button