Chimur

भिसी येथील प्राचीन चौकोनी विहीर –: ऐतिहासिक विहीरीची दुर्दशा पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांनी केली विहीरीची पाहणी

भिसी येथील प्राचीन चौकोनी विहीर –: ऐतिहासिक विहीरीची दुर्दशा

पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांनी केली विहीरीची पाहणी

चिमूर–प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर–::: चिमुर तालुक्यातील भिसी गाव ऐतिहासिक वारस्याने नटलेलं आहे. भिसी येथे अगदी बसस्थानका जवळ प्राचीन व ऐतिहासिक हेमाडपंती मंदीर आहे. विविध कलाकृती, कोरीवकाम व नक्षीकामाचे उत्तम उदाहरण आहे. त्याचबरोबर भिसी गावाच्या बाहेर ( चौरस्ता) पुयारदंड रोडलगत चौकोनी विहीर आहे. भिसी येथे चौकोनी विहीर असल्याने भिसी या गावाला ऐतिहासिक महत्त्व आले आहे. ह्या विहीरीला भगदाड पडले असुन जागोजागी भेगा गेल्या आहेत. ही विहीर प्राचीन काळातील “राखोरी “या विटापासुन बनली आहे. ही विहीर मध्ययुगीन काळातील आहे.ही विहीर दुर्मिळ असुन क्वचित च आढळते. विदर्भातील परमार राजे जगदेव यांच्या काळात चौकोनी विहीर बांधल्याचा तज्ञ इतिहास कारांनी अंदाज बांधला आहे.सन १२वे शतक ते १६ व्या शतकात पर्यत अशा प्रकारच्या विहीरी बांधल्या जात होत्या. १७व्या शतकापासुन दगडाने बांधकाम करण्याची पद्धत सुरु झाली.परमार राजे यांचा कालखंड इसवी सन १०९४–१२३४ आहे. सन ११वे शतके-१२वे शतकाच्या दरम्यान ही ऐतिहासिक विहीर बांधकाम केल्याचा अंदाज आहे. ही विहीर त्या काळातील मालगुजारांनी बांधली असुन तिच्या बाजुला गायमुख ची टाकी नाही याचाच अर्थ त्या काळातील मालगुजार फक्त पीण्यासाठीच या विहीरीचा वापर करीत असल्याचा अंदाज आहे. या विहिरीची सखोल माहीती ईतिहासकारांकडुन कवडू लोहकरे जाणुन घेत आहेत. या विहीरीला लाखोरी विट व चुन्याची जोडणी केली आहे. ही विहीर मजबुतीकरनाचे उत्तम उदाहरण आहे. प्राचीन विहीर असल्याने आता मात्र तिला भेगा जात आहे. विहीरीला भगदाड सुद्धा पडले आहे. त्या विहीरीची दुर्दशा झाली आहे. पुरातन विभागाने लक्ष देऊन डागडुजी करण्याची मागणी पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांनी केली आहे. यावेळी पंकज वर्मा, उमाकांत कामडी, मोहन केळझरकर, रमेश हिवरे, मनोज नंदनवार उपस्थित होते.

ज्येष्ठ इतिहासकार अशोक सिंह ठाकुर यांचे मत

भिसी येथील चौकोनी लाखोरी विहीर मजबुतीकरनाचे उत्तम उदाहरण आहे. अशाच प्रकारची विहीर वरोरा तालुक्यातील भटाळा या गावात आहे. या ऐतिहासिक विहीरीचे संवर्धन होने गरजेचे आहे.

अशोक सिंह ठाकुर
ज्येष्ठ इतिहासकार चंद्रपुर

पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांचे मत

चंद्रपुर जिल्ह्यात या वर्षी उन्हाळ्यात ४७ अंश तापमानाचा पारा असतांनाही या विहीरीला पाणी मुबलक आहे. ही आश्चर्यकारक व आनंदाची बाब आहे. आताही ह्या विहीरीतील पाण्याचा वापर जनता घरबांधकाम व पिण्यासाठी करीत आहे

कवडू लोहकरे
पुरातन प्रेमी चिमूर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button