Nashik

नांदगाव तालुक्यातील घुगे यांच्या शेतात अज्ञात इसमाने लावली मकाला आग..

  • नांदगाव तालुक्यातील घुगे यांच्या शेतात अज्ञात इसमाने लावली मकाला आग..

प्रतिनिधी : सुनिल घुमरे

नाशिक : नांदगाव तालुक्यात तळवाडे ये थी ल ज्ञानेश्वर वसंत घुगे या शेतकऱ्याची शेतात काढून ठेवलेली मका च्या पोळीला अज्ञात व्यक्तीने आग लावून केलेल्या मेहनतीला मातीमोल करण्याचा दुदैवी प्रकार घडला असून मका मोठ्या प्रमाणात जळाली आहे.यामुळे परिसरातव गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत ची माहिती अशी की तळवाडेचे शेतकरी ज्ञानेश्वर घुगे यांनी अडीच एकरामध्ये मका जातीचे पीक केले होते.मका काढून शेतामध्ये पाऊस उघडल्याने उन्हामध्ये वाळत घातली होती आणि आज मका यंत्राद्वारे काढून उद्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेण्याची प्राथमिक माहिती मिळाली असून.यात कोणी अज्ञाताने खोडसाळ वृत्तीने त्या मकाच्या गोळा करून ठेवलेल्या पोळीला आग लावली व मका जळाली असून सुमारे शंभर क्विंटलचे आसपास मकाच अंदाज येतो मका जळाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सदरची घटना आज मंगळवारी दुपारी घडली असल्याने गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून यात संबंधित शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले चे जाणवत आहे.मात्र याघ्टनेचे गांभीर्य शासकीय यंत्रणा ने वारंवार फोन करूनही ते पंचनामा करण्यासाठी त्यांनी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा संताप होता . सदर शेतकऱ्याला याचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button