Nashik

नाशिक ला अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणीसाठी कार्यालय कार्यान्वित

नाशिक ला अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणीसाठी कार्यालय कार्यान्वित

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक= नाशिक व अहमदनगर जिल्हयाकरिता आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणीसाठी नाशिक येथे कित्येक वर्षे पासून एकच कार्यालय कार्यान्वित होते.

आदीवासी विकास समितीतील प्रकरणांचा वाढता ओघ पाहता व लाभार्थ्यांच्या सोयीकरिता शासनाने 13 सप्टेंबर, 2019 च्या निर्णयान्वये नाशिक-2 हे नवीन जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार 10 जानेवारी, 2022 पासून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक-2 हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

या नवीन समितीच्या कार्यक्षेत्रात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, चांदवड, नांदगाव, निफाड, येवला, सिन्नर हे तालुके व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुके यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. नवीन नाशिक-2 समितीचे कामकाज आदिवासी विकास भवन, गडकरी चौक, नाशिक येथून सुरू करण्यात आले आहे. तरी संबंधित तालुक्यातील व कार्यक्षेत्रातील उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना तसेच या कार्यक्षेत्रातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी सेवाविषयक बाबी बाबत पत्रव्यवहार करताना सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती
नाशिक असा उल्लेख करावा असे आवाहन प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button