Yawal

चितोडा येथिल मनरेगा अतर्गत बांधलेल्या बोगस गोठा शेडची होणार चौकशी निवृत्ती धांडे यांचा पाठपुरावा.

चितोडा येथिल मनरेगा अतर्गत बांधलेल्या बोगस गोठा शेडची होणार चौकशी निवृत्ती धांडे यांचा पाठपुरावा.

शब्बीर खान यावल

यावल : चितोडा ता यावल येथिल रहीवासी निवृत्ती गोविंदा धांडे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे चितोडा येथे मनरेगा अंतर्गत लतिका घन: श्याम जंगले यांनी गोठा शेड लाभ घेतलेला आहे. तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचा गोठा शेड बांधकाम केलेला नाही अशी आयशाची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी कडे निवृत्ती धांडे यांनी केली आहे. तसेच त्याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांनी घेऊन चौकशी कामी एन.पी.वैराळकर विस्तार अधिकारी. ( सांखी की) पंचायत समिती यावल यांच्या कडे दिली आहे. सदर चौकशी दि. १२.८.२०२१ रोजी चितोडा गावी होणार आहे. तसेच चौकशी ठिकाणी अर्जदार यांना समक्ष हजर राहण्यास पत्र दिले यामुळे तालुक्यात बोगस मनरेगा चे कारभार उघड होण्याचे चित्र दिसत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button