Maharashtra

फैजपुरला  साखरपुड्यातच साध्या पध्दतीने पार पडला आदर्श विवाह

फैजपुरला साखरपुड्यातच साध्या पध्दतीने पार पडला आदर्श विवाह

फैजपूर सलीम पिंजारी प्रतिनिधी तालुका यावल

— शेख कुटुंबाने समाजाला दिला संदेश

फैजपुर शहरातील वधू व रावेर तालुक्यातील चिनावल येथील वर या दोन्ही पक्षाच्या मंडळींनी फैजपुर शहरात वधू पित्याच्या घरी साखरपुड्यातच साध्या पध्दतीने विवाह करून समाजा पुढे एक संदेश दिला आहे.
फैजपुर शहरातील तहानगर येथील रहिवासी सईदखान रशीदखान ठेकेदार यांची कन्या मुस्कान तबसूम हिचा साखरपुडा काल दि २४ जानेवारी सोमवारी चिनावल ता रावेर येथील अब्दुल जब्बार यांचे पुत्र शेख जुबेर यांच्याशी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी वधू पक्षाकडून हाजी सत्तार हाजी अकबर, युसुफखान अलियार खान,हाजी फारूक शेख हाजी सत्तार व वर पक्षाककडून चिनावल येथील शेख निसार शेठ,शेख इरफान मेंबर यांनी इस्लाम धर्मातील प्रेशित मोहम्मद सं यांच्या शिकवणीस अनुसरून विवाह साध्या पद्धतीने करावे ही शिकवण दिली आहे.त्याप्रमाणे कमी वेळेत कमी खर्चात साखरपुड्यातच साध्या पध्दतीने थेट विवाह करण्याचा वधू वर पक्षाकडे प्रस्ताव ठेवला.यावेळी समाज प्रतिष्ठांच्या प्रस्तावाला मान देऊन वधू वर पक्षाच्या मंडळींनी इस्लाम धर्मातील प्रेशित मोहम्मद सं यांच्या शिकवणीस अनुसरून यावेळी हा आदर्श विवाह साध्या पद्धतीने लावून दिला.व समाजात नवीन आदर्श निर्माण केला आहे.हा आदर्श विवाह फैजपुर शहरातील तहानगरमधील उमर मस्जिद जवळ वधुपिता सईद खान यांच्या घरी पार पडला यावेळी निकाह पढविण्याचे काम हाफिज अनस यांनी केले.यावेळी वधू पक्षाकडून वधू पिता सईदखान रशीदखान, समदखान रशीदखान,मजिदखान रशीदखान, अजीजखान रशीदखान,मुनाफखान रशीदखान,डॉ अब्दुल जलील,हाजी इकबाल शेख हुसेन,शेख हारून शेठ,शेख जलील हाजी सत्तार,माजी नगरसेवक शेख जफर, कलिमखां मण्यार,याकूबखान अलियारखान, शेख साबीर शेख सत्तार तर वर पक्षाकडून वर पिता अब्दुल जब्बार व निसार शेख,शेख इरफान मेंबर, हयातखान,असलम खान,शकील जनाब यांच्यासह समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.दरम्यान सध्यस्थीतीत कोरोना काळ सुरू आहे. कोरोना नियम पाळून कमी वेळेत कमी खर्चात हा विवाह संपन्न झाला व इस्लाम धर्मातील प्रेशित मोहम्मद शिकवणीस अनुसरून साध्या पद्धतीने झालेल्या या आदर्श विवाहामुळे वर वधू कुटुंबाचे समाजात कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button