Maharashtra

लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने केली मुलीच्या काकांची हत्या

लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने केली मुलीच्या काकांची हत्या

बुलडाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. लग्नासाठी मुलगी देण्यास नकार देत असल्याचे मुलांकडील मंडळीने मुलीच्या काका आणि वडिलांवर हल्ला चढवला. यात मुलीच्या काकाचा डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव तालुक्यातील जामोद गावात घडली आहे. या प्रकरणी मुलासह तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

या घटनेनंतर जळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत गेल्या अनेक दिवसापासून शेजारी राहणारे मुलाला लग्नासाठी मुलगी देण्यास तयार नव्हते, त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून या मुद्द्याला घेऊन दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता. मात्र हा वाद विकोपाला गेला त्यात मुलीच्या काकाला प्राण गमवावे लागले. या मारामारीत जखमी झालेल्या मुलीच्या वडिलांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button