Pune

अमोल भिसे यांची इंदापूर तालुका कृषी संघटनेच्या तालुकाअध्यक्ष पदी निवड

अमोल भिसे यांची इंदापूर तालुका कृषी संघटनेच्या तालुकाअध्यक्ष पदी निवड

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: बियाणे औषध व रासायनिक खते यांची विक्रेते यांची नुकतीच तालुकास्तरीय बैठक वनगळी येथील हॉटेल निसर्ग येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती तालुक्यातील जवळपास 250 व्यवसायिक त्याठिकाणी उपस्थिती होते.तेथेच तालुका कृषी संघटनेची स्थापना करण्यात अध्यक्षपदी अमोल हरिदास भिसे उपाध्यक्ष रोहिदास चव्हाण खजिनदार अनिल शहा यांची नूतन अध्यक्ष अमोल भिसे यांचा सत्कार मधुकर भरणे यांच्या हस्ते करण्यात आला
अमोल भिसे हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले तालुक्यातील विक्रेत्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे विक्रेत्यांनी कोणतेही दोष नसताना तक्रारीला सामोरे जावे लागत आहे त्यासाठी आपली तालुक्यातील संघटना असणे गरजेचे होते अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी टाकले आहे आपल्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी अडीअडचणी बद्दल मला संपर्क करावा मी आपल्या आडचणीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे त्यावेळी सूत्रसंचालन अनिल शहा व अतुल पाटील यांनी केले व आभार संजय मोरे यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button